टाकळी ढोकेश्वर / प्रतिनिधी,
अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री ढोकेश्वर काॅलेज येथे जनकल्याण रक्तपेढी आणी माहविद्यलयातील राष्ट्रीय सेवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण आणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन रयत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ ज्ञानदेव म्हस्के उद्घाटक म्हणुन उपस्थित होते . त्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना वृक्षारोपण व रक्तदान हे पवित्र कार्य आहे . भारतीय समाज हा वैश्विकता जपणारा आहे अशी भावना व्यक्त केली.
याप्रसंगी बोलतांना पारनेर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष ॲड रघुनाथ तथा बाबासाहेब खिलारी यांनी वृक्षारोपण व रक्तदानाचे महत्व विविध उदाहरण देऊन पटवून दिले तसेच अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे गव्हरनिंग कौन्सिल सदस्य डॉ भाऊसाहेब खिलारी यांनी महाविद्यालय राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लक्ष्मणराव मतकर हे होते त्यांनी मान्यवरांना महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहीती देवून विद्यार्थांनी रक्तदान शिबीरात सहभागी होवुन मोठ्याप्रमाणात रक्तदान करावे तसेच एक पेड माॅ के नाम या शासन उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी जनकल्याण रक्तपेढीचे डाॅ ओजस मुनोत , डाॅ. विकास वाळुंज, कार्यालयीन अधीक्षक सावकार काकडे , डाॅ विजय सुरोशी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा नामदेव वाल्हेकर, राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख प्रा शांता गडगे ,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.जिजाभाऊ घुले यांनी तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा विरेंद्र धनशेट्टी यांनी केले.

