Site icon

नवरात्री सण हा शक्ती, भक्ती आणि त्यागाचा संदेश देतो –  ब्रह्माकुमारी साधना दिदी

लोणी हवेली येथे सार्वजनिक नवरात्री उत्सवात प्रवचन

पारनेर / भगवान गायकवाड,
  नवरात्री सण हा सांस्कृतिक, धार्मिक, कृषिविषयक, आध्यात्मिक लाभ, सामाजिक एकत्रीकरण यांचे महत्व विषद करणारा धार्मिक  सण समजला जातो.आपल्याला शक्ती, भक्ती आणि त्यागाचा संदेश देतो. हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि नवीन सुरवात करण्याचे प्रतीक आहे. देवी शक्ती प्रत्येक स्त्री मध्ये आहे. आणि वाईटावर नेहमी चांगल्याचा विजय होतो. याची आठवण हा सण करून देतो. तसेच हा सण आपल्याला आपल्यातील शक्ती ओळखण्याची आणि जीवनाला नवी दिशा देण्याची प्रेरणा देतो असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्राच्या समन्वयक ब्रह्माकुमारी साधना दिदी यांनी केले त्या लोणी हवेली सार्वजनिक नवरात्री उत्सवात प्रवचन रूपी सेवा देताना बोलत होत्या. या वेळी  सरपंच जान्हवी दुधाडे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी थोरे, मच्छिंद्र कोल्हे, नामदेव सोंडकर, सिंधुताई बोंगे, शकुंतला थोरे, राधिका थोरे प्रजापिता ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्राचे सागर भाई हांडे, कौशल्या माता, राम भाई, आदी सह महिला भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    ब्रह्माकुमारी साधना दिदी म्हणाल्या की, नवरात्री हा सण पौराणिक कथा नाही तर तो आपल्यातील वाईट विचार, अहंकार, क्रोध, लोभ यावर विजय मिळवण्याचे प्रतिक आहे. देवी दुर्गेने दृष्ट शक्तींचा नाश केला. त्याच प्रमाणे आपणही आपल्यातील वाईट गोष्टी संपवून आत्मिक शुद्धतेकडे वाटचाल केली पाहिजे असे नवरात्र आपल्याला शिकवते.
सूत्रसंचालन शिवाजी थोरे यांनी केले तर आभार ईश्वरीय परिवाराने मानले.

Advertisement
Share This News On
Exit mobile version