वंचित घटकांना सर्व शासकीय सेवा देण्यास महसूल विभाग कटिबद्ध –  सुधीर पाटील

अहिल्यानगर / भगवान गायकवाड, पारनेर,

वंचित घटकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यासाठी महसूल विभाग सर्वप्रथम असेल असे मत मा. सुधीर पाटील ( उपविभागीय अधिकारी अहिल्यानगर  )यांनी आज स्नेहालय संस्थेतील मुलांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस दिनांक 17 सप्टेंबर,2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. 2 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने महसूल विभागा करवी स्नेहालय संस्थेतील मुलांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ दिला गेला. यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड काढणे, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देणे, अनाथ मुलांची रेशन कार्ड काढणे, आधार कार्ड काढणे व अपडेट करणे. ही कामे प्रामुख्याने करण्यात आली.


कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना मा. उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यात स्नेहालय सारख्या समाजसेवा करणाऱ्या संस्था कमी आहेत ज्या संस्था आहेत अशा संस्था शोधून तेथील कोणताही अनाथ बालक शासनाच्या योजने पासून दुर्लक्षित राहणार नाही याची काळजी भविष्यात महसूल विभाग घेईल.
या कार्यक्रमासाठी अपर तहसीलदार माननीय स्वप्निल ढवळे नायब तहसीलदार महसूल अहिल्यानगरचे अभिजीत वांढेकर, संजय गांधी नायब  तहसीलदार गणेश भानवसे हे  उपस्थित होते.
सदर योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांचे पूर्तता झाल्यानंतरच या योजनेचा लाभ दिला गेला. नागपूर विभागाचे मंडळ अधिकारी शेखर साळुंखे यांच्या समन्वयाने गेल्या पंधरा दिवसापासून या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांचे छाननी करण्याचे काम चालू होते. या कामी अजित पवार( संजय गांधी निराधार) गणेश आगळे ( नवनागापूर तलाठी )शिवम भालेराव( नागापूर तलाठी ) शशिकांत मोरे( तलाठी निंबळक ) आडोळे भाऊसाहेब ( खारे खर्जने श्रुती डुंबरे ( पुरवठा निरीक्षक) यांनी विशेष परिश्रम घेतले.
हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी स्नेहालय संस्थेतर्फे मा.अनिल गावडे,डॉ. प्रीती  भोंबे, ऍड. श्याम असावा. प्रकल्पाचे संचालक हनीफ शेख,प्रवीण मुत्याल, संजय बंदिष्टी,सपना असावा, गीता कौर  यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण राठोड यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाधान धालगुडे यांनी केले उपस्थितांचे आभार  कावेरी रोहकले यांनी मानले.

Advertisement
Share This News On
Exit mobile version