पारनेर / भगवान गायकवाड,
प्रफुल्लता प्रकाशन, पुणे यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या डॉ. के.आर. हांडे लिखित “गबली” या कादंबरीचा प्रकाशन सोहळा शनिवार, दि. ४ रोजी पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५.३० वाजता कृष्णलीला मंगल कार्यालय, वडझिरे येथे हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे.
या प्रकाशन सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. डॉ. प्रकाश गरुड यांच्या शुभहस्ते कादंबरीचे प्रकाशन होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. आर.जी. सय्यद असतील.
यावेळी डॉ. योगेश गरुड, ॲड. विनायक करकंडे, ह.भ.प. माऊली महाराज चाळक, ह.भ.प. केशव महाराज जगदाळे, ह.भ.प. शिवानी महाराज चाळक, गुलाब सपकाळ (सर), सोपान लंके, डॉ. महेश वीर, शरददादा चौधरी, रामशेठ एरंडे, डॉ. बागल, डॉ. अपूर्वा फिरोदिया, डॉ. अक्षय फिरोदिया, डॉ. महेश जरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा महत्त्वपूर्ण साहित्यिक सोहळा यशस्वी करण्यासाठी पारनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन आणि समस्त ग्रामस्थ, वडझिरे यांनी पुढाकार घेतला आहे. साहित्यप्रेमींनी आणि वाचकांनी या प्रकाशन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. डॉ. हांडे यांच्या या नवीन साहित्यकृतीबद्दल साहित्य वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

