Site icon

धोत्रे खुर्द गावातील दोनशे महिलांना मोफत देवदर्शन..

पारनेर /प्रतिनिधी

धोत्रे खुर्द येथील यश भैय्या रहाणे मित्रमंडळाच्या वतीने दोनशे महिलांना मोफत देवदर्शन यात्रेचे नुकतेच आयोजन केले होते. नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून एक दिवस हक्काचा माझ्या माता भगिनींचा हा उपक्रम यावर्षी राबविण्यात आलेला आहे

धोत्रे खुर्द – रांजणगाव गणपती – कवठे यमाई माता – निघोज मळगंगा माता येथे २ बसेस व १० चार चाकी गाड्यातून या महिलांना हे देवदर्शन घडविले गेले. या उपक्रमाचे यंदाचे प्रथमच वर्षे आहे.

ज्येष्ठ नेते संभाजीराव रोहोकले शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, यांच्या मार्गदर्शनाखाली यश भैय्या रहाणे यांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू आहे. रांजणगाव गणपती येथे श्रींचे दर्शन घेतल्यानंतर रांजणगाव गणपती ट्रस्टच्या वतीने आयोजकांचा सन्मान करण्यात आला.

विविध क्षेत्रात सामाजिक कार्य केलेल्या महिलांचे या वेळी सत्कार केले गेले. रांजणगाव गणपती, कवठे यमाई माता, निघोज येथील मळगंगा माता दर्शनानंतर धोत्रे खुर्द गावी सर्व महिला आल्या. अनावश्यक खर्च टाळून गावातील भाविक महिलांना देव दर्शन घडवले जाते यावर्षी प्रथमच हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

या कार्यक्रम प्रसंगी माजी सरपंच बाबासाहेब सासवडे  राहुल तांबे, जालिंदर भांड, नागेश नरसाळे, दीपक भागवत,  सुभाष सासवडे, सुभाष मंचरे, संदीप मंचरे, विशाल भांड, कुंदन सासवडे, संकेत नाईकवाडी, आकाश सासवडे, वैभव लबडे, बाबासाहेब राहींज, ज्ञानदेव संजय राहींज, सचिन राहींज, नितीन राहींज, राहुल राहींज, मयूर धांबोरे, श्रीकांत धांबोरे, चंदू तागड, सुमित नाईकवाडी, कार्तिक सासवडे, सचिन नाईकवाडी, महेश नाईकवाडी,ओम नाईकवाडी, विकास सासवडे ,विशाल भांड, निशांत धांबोरे, संतोष धांबोरे आदींसह माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Share This News On
Exit mobile version