पारनेर / भगवान गायकवाड,
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पारनेर दौऱ्यादरम्यान, राम रहीम बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी (अहिल्यानगर) जिल्ह्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते रफिक शेख मेजर यांनी स्वतः उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या आशयाचे निवेदन सादर केले. अल्पसंख्याक समाजातील गरजू व्यक्ती आणि उद्योजकांसाठी मौलाना आझाद महामंडळाकडून कर्ज व इतर योजनांचा लाभ मिळतो. यासाठी जिल्ह्याला पुरेसा निधी मिळावा, अशी मागणी शेख मेजर यांनी केली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पारनेर नगर विधानसभा सदस्य काशीनाथ दाते सर, जिल्हाधिकारी पंकज आशिया, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, तसेच वसंत चेडे, दिलीप दाते, नियाज राजे, रियाज राजे, किरण कुबडे, इमरान शेख, आवेज राजे, रेहान राजे आदी मान्यवर उपस्थित होते. राम रहीम प्रतिष्ठानच्या या मागणीमुळे अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक विकासाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले गेले आहे.
मौलाना आझाद महामंडळव निधी साठी राम रहीम प्रतिष्ठानची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

