पारनेरचे नगराध्यक्षपद ओबीसींसाठी राखीव; भाऊसाहेब खेडेकरांना ‘संधी’ मिळाली तर आता ‘सोनचं’ होणार!
ओबीसी आरक्षणामुळे इच्छुकांचे वाढले बळ
पारनेर प्रतिनिधी :
आगामी पारनेर नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, हे पद इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) राखीव झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. अनेक वर्षांपासून सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय असलेल्या आणि नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या अनेक ओबीसी नेतृत्वासाठी ही मोठी संधी चालून आली आहे. याच संधीकडे लक्ष लागून असलेले एक प्रमुख नाव म्हणजे भाऊसाहेब खेडेकर.
भाऊसाहेब खेडेकरांचा नगराध्यक्षपदासाठी प्रबळ दावा
पारनेरच्या राजकीय वर्तुळात भाऊसाहेब खेडेकर हे एक परिचित आणि लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहे. सामान्य कुटुंबातून आलेले, मात्र आपली निष्ठा आणि जनसंपर्काच्या बळावर त्यांनी समाजकारणात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. अनेक वर्षांपासून त्यांनी सामाजिक काम अत्यंत निष्ठेने केले आहे. समाजासाठी पडेल ते काम करण्याची त्यांची तयारी आणि जनसामान्यांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची वृत्ती यामुळे ते लोकांमध्ये लोकप्रिय आहेत.
नगराध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसी प्रवर्गासाठी जाहीर होताच, भाऊसाहेब खेडेकर यांनी आपला दावा अधिक प्रबळ केला आहे. आतापर्यंतच्या त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक कामाचा अनुभव पाहता, जनतेने त्यांना संधी दिल्यास ते एक सक्षम नेतृत्व देऊ शकतात, असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत.
‘संधी मिळाली तर आता सोनचं होणार’
नगराध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसींसाठी राखीव झाल्याने, भाऊसाहेब खेडेकर यांना मिळालेली ही संधी ‘सोनचं’ करणारी ठरू शकते. एका लोकप्रिय नेतृत्वाला जर जनतेने सहकार्य केले आणि नगरपंचायत निवडणुकीत विजय मिळाला, तर पारनेरच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
भाऊसाहेब खेडेकर यांच्याकडे पारनेर शहराच्या विकासाची स्पष्ट दृष्टी आहे. पाण्याची समस्या, अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था आणि युवकांसाठी रोजगार संधी यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांचा विशेष भर असेल, असे बोलले जात आहे.

