Site icon

आदिवासी विकासासाठी वनकुटे येथे विशेष ग्रामसभा

आदिवासी विकासासाठी वनकुटे येथे विशेष ग्रामसभा

आदी कार्ययोगी अंतर्गत आदिवासी बांधवांना योजनांची माहिती, विकास आराखडा तयार

पारनेर/प्रतिनिधी : 

वनकुटे अंतर्गत ठाकरवाडी येथे दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी आदी कार्ययोगी अंतर्गत विशेष ग्रामसभेचे आयोजन सरपंच सुमन रांधवण करण्यात आले. या ग्रामसभेला आदिवासी समाजातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभेचे आयोजन गावच्या विकासासाठी आणि आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी करण्यात आले होते. यावेळी आदी कार्ययोगी अंतर्गत गावाच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला, ज्यामध्ये स्थानिक गरजा आणि प्राधान्यांना महत्त्व देण्यात आले.

ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांना शासकीय योजनांचे लाभ, त्यांचे अर्जप्रक्रिया आणि पात्रता याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यामुळे आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण झाली. ग्रामपंचायत अधिकारी नितीन सुंबे यांनी योजनांच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले, तर सरपंच सुमन रांधवण यांनी ग्रामसभेचे नेतृत्व करत गावकऱ्यांना विकासकामांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

ग्रामसभा आमच्या गावाच्या विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. आदिवासी समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने आमचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. यापुढेही असेच सहकार्य आणि एकजूट ठेवून गावाचा सर्वांगीण विकास साध्य करू

सरपंच सुमन रांधवण (वनकुटे)

Advertisement
Share This News On
Exit mobile version