Site icon

कोल्हापूर याठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची महामंडळ सभा उत्साहात संपन्न

पारनेर / भगवान गायकवाड,

        सर्वच खात्यातील कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य सुविधा लागू करण्यात आलेल्या आहेत, त्याचप्रमाणे शिक्षकांनाही कॅशलेस आरोग्य सुविधा लागू करण्याचे आश्वासन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री  प्रकाश आंबीटकर यांनी दिले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कोल्हापूर येथे झालेल्या महामंडळ सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  सर्वोच्च न्यायालयात टीइटी संदर्भात दिलेला निर्णय शिक्षकांच्यावर अन्याय करणारा असून याबाबत महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात सविस्तर चर्चा करून न्यायालयात फेरविचार याचिका शिक्षण मंत्री यांचे मार्फत दाखल करणार असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
         महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने अतिशय जलद बोलवलेल्या महामंडळ सभेत वरील मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. महाराष्ट्र राज्याचे नेते  संभाजीराव थोरात व राज्याचे राज्याध्यक्ष  बाळासाहेब मारणे हे उपस्थित होते. या महामंडळ सभेला पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष  उत्तमराव भंडारे, विभागीय अध्यक्ष  बापूसाहेब लांडगे पुणे जिल्हा संघाचे कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर पुंडे, सल्लागार ज्ञानेश्वर तिरखुंडे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ गायकवाड, राज्य संपर्क प्रमुख लहू शितोळे, पुणे जिल्हा डीसीपीएस चे अध्यक्ष बबनराव माहळसकर शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष  संतोष गावडे, सरचिटणीस आप्पासाहेब रसाळ, नेते संतोष शेवाळे, कोषाध्यक्ष आबासाहेब जाधव, संपर्कप्रमुख हिरामण ढोकले, नेते दीपक सरोदे, संतोष पळसकर, संजय वाळके, रोहिदास काळे, सल्लागार तानाजी वाघमारे, राजाराम सकट, खंडू निचित माऊली कुरंदळे, विनायक पवार, राजेश चिकटे, माजी सरचिटणीस वामनराव सातपुते, किसन सालकर, दत्तात्रय गायकवाड, विनायक वाळके, अनिल कटके,  गणेश जगताप, एकनाथ रोकडे, आदींसह शिरूर तालुका शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Advertisement
Share This News On
Exit mobile version