महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पारनेर तालुकाध्यक्ष पदी अविनाश मुरलीधर पवार यांची नियुक्ती

 पारनेर / भगवान गायकवाड,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी अविनाश मुरलीधर पवार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.मनसे अध्यक्ष सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच पक्षाचे नेते मा. बाळा नांदगावकर व  माथाडी कामगार सेना अध्यक्ष सचिन गोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष श्री सचिन डफळ साहेब यांच्या हस्ते ही नियुक्ती पार पडली.



नवीन तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना अविनाश पवार यांनी सांगितले की,

> “पारनेर विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे असतानाही काही माजी पदाधिकाऱ्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली होती. काहींनी आर्थिक चिरी-मिरी करून पक्षविरोधी मतदान केले. अशा पदाधिकाऱ्यांवर लवकरच शिस्तभंगाची कारवाई करून हकालपट्टी केली जाईल. पक्षाशी निष्ठा ठेवून काम करणाऱ्या नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल.”

पवार यांनी पुढे सांगितले की,

“मनसेच्या कार्यसंघात नव्या ऊर्जेचा आणि निष्ठांवान कार्यकर्त्यांचा समावेश करून पारनेर तालुक्यात पक्ष मजबूत करण्याचे उद्दिष्ट आहे. लवकरच गटनिहाय नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असून प्रत्येक्ष गावपातळीवर पक्ष संघटना मजबूत करुन सक्षम  केली जाईल.”

सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर श्रद्धा ठेवून पारनेर तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बळ अधिक वाढवण्याचा निर्धार तालुका अध्यक्ष अविनाश पवार यांनी व्यक्त केला यावेळी महेंद्र गाडगे,विशाल गवळी, यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.

मनसे पक्षस्थापने पासूनचा निष्ठावंत कार्यकर्ता, कुठल्याही अमिषाला बळी न पडता पक्ष कार्य करत असताना अनेक गुन्ह्यांची चिंता न करता शेतकरी  दूध दरवाढीच्या संदर्भात असेल, वीज प्रश्न असेल, स्थानिक रस्ते असतील, सुपा एमआयडीसी मधील कामगारांचे प्रश्न, गरिबांना हास्पिटल मध्ये मदत, तहसील कचेरी असो की पोलिस स्टेशन मध्ये नागरिकांना अडचणी असे एक ना अनेक सामाजिक प्रश्न अविनाश पवार यांनी  उचलून धरुन न्याय दिला, तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवून सर्वच पक्षांना आव्हान दिले होते त्यामुळे पुन्हा एकदा उभारी घेऊन नव्या जोमाने पक्षाचे प्रमाणिक काम केल्याचे फळ त्यांना मिळाल्याची भावना जनसामान्यातून व्यक्त होत आहे.

Advertisement
Share This News On
Exit mobile version