पारनेर महाविद्यालयात ‘सप्तरंगचे’ आयोजन; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ !
पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी सप्तरंग या भव्य गायन व नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाचा सांस्कृतिक विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमात हजारो रुपयांची पारितोषिके जिंकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार…


