Headlines

सावली ऑफ नर्सिंगची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम – डॉ.भाऊसाहेब खिलारी

टाकळी ढोकेश्वर/ प्रतिनिधी,

तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सावली प्रतिष्ठान संचलित सावली स्कूल ऑफ नर्सिंगचा पंधराव्या बॅचचा शंभर टक्के निकाल लागला असून निकालाची परंपरा कायम राहिली आहे.

उत्तीर्ण सर्व विद्यार्थिनींचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावर्षी अनुक्रमे ए. एन. एम. द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कु.अलीशा शेख हिने ८४.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे, द्वितीय क्रमांक पलक वंजारे हिने ७९.८३ टक्के गुण त्याचप्रमाणे  बेबी थोरात हिने ७९.३३ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच इतर सर्व विद्यार्थिनी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाल्या आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की सावली प्रतिष्ठान व सावली स्कूल ऑफ नर्सिंग त्याचप्रमाणे साई सावली हॉस्पिटल यांच्या माध्यमातून दर वर्षी  गावागावात विविध आरोग्य शिबिरे, एडस जनजागृती मोहिम व रॅली, विविध पथनाटये, मुलगी वाचवा देश वाचवा अभियान घेवुन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण भागातील आदिवासी व गोरगरीब मुलींना नर्सिंगचे शिक्षण मिळावे या हेतूने ही संस्था कार्यरत असून उत्तम परिचारिका घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी अनुभवी तज्ञ डॉक्टर मार्गदर्शन देत असल्याचे डॉ. खिलारी यांनी सांगितले. या विद्यार्थिनींना सावली स्कुल ऑफ नर्सिंग च्या प्राचार्या शितल गर्कळ मॅडम , प्रा.नामदेव वाळुंज सर, प्रा.पुष्पा घुले मॅडम, प्रा. पिंकी त्रिभुवन मॅडम, डॉ मुळे सर यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थिनींचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब खिलारी, सचिव संतोष सोनावळे, उपाध्यक्ष प्रताप खिलारी, गणेश चव्हाण, नितीन आंधळे त्याच प्रमाणे साई सावली हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी वृंद यांनी विशेष अभिनंदन केले.

Advertisement
Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *