Headlines

पुणेवाडीत रंगला राज्यस्तरीय कबड्डीचा थरार; उत्कृष्ट आयोजनाने खेळाडू मंत्रमुग्ध

पारनेर / भगवान गायकवाड,

      पुणेवाडीमध्ये माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमुळे सध्या पुणेवाडीत कबड्डीचा थरार अनुभवयाला मिळत आहे. मॅटवर सुरू असलेल्या या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन संकल्प फाऊंडेशनने केले असून, क्रीडाप्रेमी मोठ्या उत्साहाने याचा आनंद घेत आहेत.
माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे यांच्या पुढाकारातून गेल्या सात वर्षांपासून दिवाळीच्या काळात या खुल्या कबड्डी स्पर्धांचे आयोजन सातत्याने केले जात आहे. यावर्षी स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम बक्षीस रु. ३१,०००/- (भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्या वतीने), द्वितीय बक्षीस रु. २५,०००/- (नगरसेवक युवराज पठारे, गायत्री एंटरप्रायजेसचे अभिषेक देशमुख यांच्या वतीने), तृतीय बक्षीस रु. २१,०००/- (सरपंच किरण ठुबे, नगरसेवक नवनाथ सोबले यांच्या वतीने) आणि चतुर्थ बक्षीस रु. १५,०००/- (संतोष शेठ घोडे, गोरख शेठ पठारे, संचालक, बैलगाडा संघटना यांच्या वतीने) असे ठेवण्यात आले आहे.


रविवारी स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, जेष्ठ पत्रकार शिवाजी शिर्के, पारनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, पत्रकार विनोद गोळे, कान्हुरपठारचे सरपंच किरण ठुबे, माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले, दिपक रेपाळे, सुहास मोढवे, भाजपचे मंडल सरचिटणीस कल्याण थोरात, सुमित गायकवाड, अभि रेपाळे, आदिनाथ रेपाळे, विश्वास रेपाळे, दादू रेपाळे, तुषार बोरुडे, वैभव गायकवाड, सुशांत रेपाळे, योगेश रेपाळे, अक्षय दुश्मन, पप्पू चेडे, गणेश दुश्मन, संतोष गाडेकर, आविष्कार जेडगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावर्षी स्पर्धेच्या आयोजनात करण्यात आलेला बदल विशेष कौतुकास्पद ठरला आहे. दरवर्षी मातीच्या मैदानावर होणारी ही स्पर्धा यंदा प्रथमच मॅटवर (Mat) आयोजित करण्यात आली आहे. या आधुनिक बदलामुळे राज्यातील खेळाडूंनी आयोजक बाळासाहेब रेपाळे यांच्या नियोजनाचे विशेष कौतुक केले आहे. यासोबतच अत्याधुनिक टायमर आणि गुणतक्त्याच्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उत्कृष्ट समालोचक ऋषीकेश औटी आणि सुभाष रेपाळे यांच्या ओघवत्या संचलनाने क्रीडाप्रेमी मंत्रमुग्ध होत आहेत.
अहिलीनगर-पुणेवाडी, टाकळी ढोकेश्वर-श्रीरामपूर, राळेगणसिद्धी-सोनई यांसारखे सामने अत्यंत रंगतदार झाले. पुणेवाडीसह पारनेर तालुक्यातील अनेक गावांतून क्रीडाप्रेमी या कबड्डी स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. स्पर्धेचे यशस्वी पंच म्हणून अभिषेक वरखडे, सचिन नरवडे, बाबाजी साळुंखे, काशीद सर, तर गुणलेखक म्हणून रमेश रेपाळे, प्रशांत ठुबे आणि अभिषेक भोसले हे काम पाहत आहेत. माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे यांच्या संकल्पनेतून आणि संकल्प फाऊंडेशनच्या उत्कृष्ट आयोजनातून सुरू असलेला हा राज्यस्तरीय कबड्डीचा थरार पुणेवाडीच्या क्रीडा परंपरेला नवी ओळख देत आहे.

Advertisement
Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *