राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) तहसीलदारांना निवेदन
पारनेर, भगवान गायकवाड,
पारनेर आणि कान्हुरपठार महसूल मंडळातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीचे अनुदान त्वरित मिळावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), पारनेर यांच्या वतीने लेखी निवेदन नायब तहसीलदार दिपक कारखिले यांच्या कडे देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार पंचनामे होऊन इतर भागातील शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, पारनेर महसूल मंडळ व कान्हुरपठार महसूल मंडळ या भागातील शेतकऱ्यांना पावसाचे निकष लावून पिकाच्या नुकसानीच्या अनुदानापासून वंचित ठेवले गेले आहे, जे अत्यंत चुकीचे आहे. या दोन्ही महसूल मंडळांमध्येही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने तहसीलदारांना विनंती केली आहे की, त्यांनी या भागातील शेतकरी बांधवांच्या नुकसानीचा सकारात्मक अहवाल शासनाकडे पाठवून सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
आठ दिवसांत मदत न मिळाल्यास आक्रोश मोर्चाचा इशारा….
निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, जर दोन्ही महसूल मंडळातील शेतकऱ्यांना आठ दिवसांत नुकसानीबद्दल आर्थिक मदत मिळाली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), खा. निलेश लंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने तहसील कार्यालयावरती मोठा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. याची नोंद घ्यावी, असा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावर दिपक लंके,कारभारी पोटघन, ,बाबासाहेब भिकाजी तरटे, संतोष खोडदे,अर्जुन जयवंत भालेकर, योगेश अशोक मते, बाळासाहेब नगरे, भूषण उत्तम शेलार, अमित जाधव, मारुती भिकाजी रेपाळे, सुभाष किसन रेपाळे, मोहन खंडू रेपाळे, बबन मारुती डमरे, राहुल दत्तात्रय चेडे, प्रसाद अशोकराव नवले, प्रशांत सखाराम बोरुडे, संदीप विठ्ठल गाडेकर, प्रशांत बाळासाहेब साळवे, शहाजी बापू थोरात, सुरेश रामभाऊ झगडे, एकनाथ मारुती पवार, मयूर नामदेव गायकवाड, प्रमोद द्यानदेव वाखारे आदींसह अनेक पदाधिकाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



