Headlines

निघोज जिल्हा परिषद गटातून मंगेश कारखिले इच्छुक; भेटी गाठी व संपर्क सुरू केल्याने मंगेश कारखिले यांचे पारडे जड

पारनेर / प्रतिनिधी,

पारनेर तालुक्यात जिल्हा परिषद निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या निघोज जिल्हा परिषद गटातून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत करत असलेले राळेगण थेरपाळ चे युवा नेते मंगेश कारखिले हे इच्छुक आहेत . त्यांनी भेटी गाठी सुरू केल्याने या निवडणूकीत मोठी रंगत आली असून मोठी चुरस निर्माण झाली आहे.


     निघोज जिल्हा परिषद गटात निघोज व अळकुटी पंचायत समिती चे २ गण असून निघोज गट व गण  पुरुषांसाठी राखीव, तर अळकुटी गण महिलांसाठी राखीव झाला आहे. या गटातील इच्छुक उमेदवारांनी चाचपणी सुरू केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.


     या गटातील जनतेला नवा चेहरा हवा होता, तो राळेगण थेरपाळ चे युवा नेते मंगेश कारखिले यांच्या रूपाने मिळाला आहे. त्यांचे आजोबा दिवंगत रामभाऊ तात्या कारखिले यांनी जिल्हा परिषदेचे सभागृह त्यांच्या अभ्यासू भाषणांनी गाजवलेली होती. त्यांचा त्यावेळी पारनेर तालुक्यातील राजकारणात शब्दाला मान व धार होती. अशा या कारखिले परिवारात राजकीय बाळकडू लाभलेले मंगेश कारखिले हे राज्याला शैक्षणिक क्षेत्रात दिशा देणाऱ्या रयत शिक्षण संस्थे त ज्ञानदानाचे पवित्र काम करतात. त्यांनी हे कार्य करताना अनेक निराधार व गरजूंना विविध संस्थांच्या माध्यमातून मोठी आर्थिक मदत देण्याचे काम केले व वेळप्रसंगी स्वतः च्या खिशाला झळ देऊन अनेकांना मदत करण्याचे काम केले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील ज्ञानदानाची उच्च पदवी घेत अनेक पिढ्या घडविण्याचे काम अंगीकारल्याने त्यांचे विद्यार्थी आज विविध ठिकाणी उच्च पदांवर कार्यरत आहे.
      कारखिले यांचा निघोज जिल्हा परिषद गटातील निघोज, राळेगण थेरपाळ, पठारवाडी, गुणोरे, वडनेर, अळकुटी, रांधे, शिरापूर व इतर गावांमध्ये मित्र, नातेवाईक, आप्तेष्ठ असा मोठा परिवार आहे. तालुक्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ते सातत्याने उपस्थित असतात, त्यांचा फार मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे ही निवडणूक त्यांना अत्यंत सोपी आहे, ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

मंगेश कारखिले हे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असल्याने जिल्हाभरातील शिक्षक त्यांना या कामी नक्कीच मदत करतील, असा आशावाद शिक्षकांनी व्यक्त केला आहे.

Advertisement
Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *