विकास ही न थांबणारी निरंतर चालणारी प्रक्रिया : आमदार काशिनाथ दाते

वारणवाडीत ७९ लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

पारनेर : भगवान गायकवाड,

रोज नव्याने लक्षावधी रुपयांची विकासकामे मार्गी लागत असली तरीही नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागविण्याच्या दृष्टीकोनातून रोज नव्याने विविध समस्या उभ्या राहत असतात. अशा समस्यांची प्राधान्याने सोडवणूक करणे ही लोकप्रतिनिधी म्हणुन माझी जबाबदारी आहे. ह्याची प्रकर्षाने जाणीव असून विकास ही न थांबणारी व निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने पारनेर-नगर मतदार संघातील विविध विकासकामांचा जबाबदारीपूर्वक शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करून विकास कामे मार्गी लावली जात असल्याचे मत आमदार काशिनाथ दाते सरांनी रविवार दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी वारणवाडी येथिल विविध विकासकामांच्या भुमिपूजन प्रसंगी व्यक्त केले.

रविवार दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी वारणवाडी (ता. पारनेर) येथे पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते ५ एम.व्हि.ए नविन ट्रान्सफार्मर (₹४५ लाख), जि.प.प्रा.शाळा खोली बांधकाम (₹१2 लाख), काशिद वस्ती येथे नविन लाईट जोडणी (₹१2 लाख) तसेच हांडेवाडा बिरोबा मंदीर सभामंडप (₹१0 लाख) अशा एकुण 79 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

कार्यक्रमात पुढे बोलताना आमदार दाते सर म्हणाले कि, पारनेर-नगर मतदार संघाच्या विकासासाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरु असून मतदार संघातील जनतेच्या सार्वजनिक इच्छा-आकांक्षांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आदींच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत होत आहे. कामटवाडी-वारणवाडी या गावांचा आपल्या राजकीय जडणघडनीत मोठा वाटा असून यापुढील काळात विधानसभा पदाच्या माध्यमातून या भागातील जनतेला उचित न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, नगरसेवक पै. युवराज पठारे, महिला तालुकाध्यक्षा सौ. सुषमा रावडे, उपाध्यक्ष आर. एस. कापसे सर, सरचिटणीस सुभाष दुधाडे, युवा तालुकाध्यक्ष भास्कर उचाळे, सरपंच साहेबराव वाफारे, सरपंच लहु भालेकर, विकास पवार, सुभाष सासवडे, विकास रोकडे, शिवाजी खिलारी, देवराम मगर, शुभम टेकुडे, शुभम पवार, अमोल रोकडे, अक्षय ढोकळे, अक्षय गोरडे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विकासकामांमुळे वारणवाडी परिसरातील नागरिकांच्या सुविधेत मोठी भर पडणार आहे.

Advertisement
Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *