पारनेर / प्रतिनिधी,
पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ आणि वडगाव दर्या निसर्ग पर्यटन केंद्राच्या विकास कामांचे लोकार्पण माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले. तसेच, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २ अंतर्गत सौर प्रकल्पाचे भूमिपूजनही यावेळी पार पडले.
वडगाव दर्या निसर्ग पर्यटन केंद्रासाठी ९ कोटी रुपये निधी मंजूर असून, सध्या १.८० कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. या विकास कामांचे लोकार्पण आणि कान्हूर पठाराला सिंचनाचे पाणी मिळावे यासाठी सर्वेक्षणाचा शुभारंभ यावेळी झाला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानुसार हे सर्वेक्षण पारनेरच्या दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. याशिवाय, सौर कृषी वाहिनी योजना २ अंतर्गत सौर प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले.
“पारनेर तालुक्याच्या पठार भागाचा पाणी प्रश्न फक्त राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटीलच सोडवू शकतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न आता मार्गी लागेल आणि शेतकरी, कष्टकरी जनतेचे हित साधले जाईल.”
विश्वनाथ कोरडे यांनी यावेळी सांगितले, “मला निवडणुकीचे तिकीट नको, माझ्या पठार भागाला पाणी द्या आणि त्या कामाची प्रमा माझ्या हातात द्या. मी राजकारण फक्त विकासासाठी करतो. आतापर्यंत अनेक पाणी प्रश्न सोडवले असून, आता नामदार राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांच्यासह पठार भागाचा पाणी प्रश्न मार्गी लावणार.”
पारनेर तालुक्याच्या पठार भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले प्रयत्न आता फलद्रूप होताना दिसत आहेत. शेतकरी आणि कष्टकरी जनतेला यामुळे दिलासा मिळण्याची आशा आहे.
या सोहळ्याला भाजप अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीपराव भालसिंग, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विक्रम कळमकर, शिवाजी खिलारी, राजाराम एरंडे, वसंत चेडे, सचिन वराळ, माजी सभापती गणेश शेळके, नगरसेवक युवराज पठारे, दत्तात्रय रोकडे, डॉ. भाऊसाहेब खिलारी, माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे, राजेंद्र शेळके, दादाभाऊ सोनावळे, सुभाष दुधाडे, किसनराव शिंदे, भाजप महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात, सुधामती कवाद, राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष सुषमा रावडे, युवती तालुका अध्यक्ष अपर्णा खामकर, सागर मैड, दत्तानाना पवार, दिनेश बाबर, सरपंच लहू भालेकर, चेअरमन शिवाजी रोकडे, अब्बास मुजावर, वसंत शिंदे, अर्जुन नवले, सखाराम ठुबे, भरत ठुबे, बबन व्यवाहारे, सुशांत ठुबे, गणेश ठुबे, कानिफ ठुबे, गोकुळ ठुबे यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पदाधिकारी आणि कान्हूर पठार येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारनेर तालुक्याच्या पठार भागाचा पाणी प्रश्न फक्त नामदार विखे पाटीलच सोडवू शकतात – विश्वनाथ कोरडे
