पारनेर / भगवान गायकवाड,
स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षीच्या शिक्षक दिनानिमित्त एक विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे हे सहावे वर्ष आहे. या कार्यक्रमात स्व. इंदिरा शामकांत मोरे पुरस्कृत व स्व. शोभा महादेव कुलकर्णी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार तीन स्तरांवर प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये सौ. सुमित्रा सुदेश छजलानी (जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका, नागरदेवळे) यांना सन 2025 चा स्नेहालय इंग्लिश मीडियम शाळेचा प्रतिष्ठित राज्यस्तरीय इंदिरा शामकांत मोरे पुरस्कृत स्वर्गीय शोभा महादेव कुलकर्णी आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच अश्विनी कोचर (स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, अहिल्यानगर) आणि प्रतीक्षा साळवे (शिक्षिका, बालभवन प्रकल्प, स्नेहालय, अहिल्यानगर) यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.

याशिवाय स्व. गोपालभाई गुजर स्मृती आदर्श कर्मचारी पुरस्कार संस्थेतील कार्यासाठी रमाकांत दोडी (मानस ग्राम प्रकल्प, स्नेहालय) यांना प्रदान करण्यात येणार आहे. सर्व पुरस्कार थोर विचारवंत व शिक्षण तज्ञ् डॉ.गिरीश रांगणेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.
या सर्व पुरस्कारांद्वारे शिक्षक आणि कर्मचारी यांच्या कार्याचा गौरव करण्यात येईल. कार्यक्रमात सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रकमेचा धनादेश देऊन गौरव करण्यात येणार असल्याची घोषणा समितीचे सदस्य राजीव भाई गुजर, डॉ. प्रीती भोम्बे, डॉ. गिरीश कुलकर्णी, राजेंद्र शुक्रे
हनीफ शेख, प्रवीण मुत्याल, अनिल गावडे, गीता कौर, वैशाली चोपडा वीणा मुंगी व उषा खोलाम यांनी केली.
हा सोहळा येत्या ८ सप्टेंबर रोजी स्नेहालयाच्या मुथा सभागृहात पार पडणार असून, या पुरस्कारा वितरण कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने इतर शाळेतील शिक्षक, पालक, विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा मुंगी यांनी केले आहे.