उद्योजक सचिन गोडसे यांची गणेश उत्सव मंडळांना मदत
पारनेर/प्रतिनिधी :
सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले आणि मुंबईस्थित उद्योजक तसेच धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन गोडसे यांनी सावरगाव परिसरातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. या भेटीं दरम्यान त्यांच्या हस्ते गणेश आरती संपन्न झाल्या. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी मंडळांना सौजन्य भेटी दिल्या व गणेशोत्सव मंडळांना मदत केली आणि उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
सचिन गोडसे यांनी श्री शिवाजीशेठ बेलकर मित्र मंडळ, काळेवाडी; जय भवानी श्री गणेश मित्र मंडळ, तराळ वस्ती, काळेवाडी; चौफुला मित्र मंडळ, काळेवाडी-लांडगेवाडी; कानिफनाथ सेवा मंडळ, गोडसेवाडी; श्री गणेश मित्र मंडळ, मेनदरा ग्रुप; राजमुद्रा युवा प्रतिष्ठान, सावरगाव; हनुमान मित्र मंडळ, चिकणेवाडी; गोसावी बाबा मित्र मंडळ, चिकणी झाप; श्री गणेश तरुण मंडळ, गोडसेवाडी-माळवाडी आणि मुंजेश्वर शिवाजी मित्र मंडळ, मानेवाडी यांना देणग्या आणि गणपती मूर्ती भेट दिल्या. याशिवाय, सावरगाव येथील स्थानिक घरगुती गणेश मूर्तींचेही त्यांनी दर्शन घेतले. विशेष म्हणजे, महिलांसाठी आयोजित संगीत खुर्ची स्पर्धेत तीन पैठणी साड्यांचे बक्षीस देण्यात आले.
गणेशोत्सवाच्या या भेटीं दरम्यान सचिन गोडसे यांनी उपस्थितांना उत्सवाच्या शुभेच्छा देत सामाजिक एकता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे आवाहन केले. त्यांच्या या भेटींमुळे सावरगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक मंडळांनी त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.