टाकळी ढोकेश्वर/ प्रतिनिधी,
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्री ढोकेश्वर कॉलेज, टाकळी ढोकेश्वर.येथे ग्रंथपाल पदावर कार्यरत असणाऱ्या ग्रंथपाल प्रा. शुबंगी पवार या प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) उतीर्ण झाल्या आहेत. यानिमित्ताने महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष श्री.रामचंद्रजी दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव अॅड.विश्वासराव आठरे पाटील , सहसचिव मुकेशदादा मुळे, खजिनदार अॅड. दिपलक्ष्मी म्हसे, ज्येष्ठ विश्वस्त सितारामजी खिलारी, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य डॉ. भाऊसाहेब खिलारी, तसेच अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर, उपप्राचार्य प्रा.वीरेंद्र धनशेट्टी व सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर सेवक यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.