Headlines

पारनेर मध्ये राष्ट्रीय लोकअदालतीत २३१ प्रकरणे निकाली

पारनेर / भगवान गायकवाड,

        पारनेर आयोजित येथे राष्ट्रीय लोकअदालतीत दि. १३ सप्टेंबर रोजी तब्बल २३१ प्रकरणे निकाली निघाली असून, रु. ५,१०,५७८९/- ची विक्रमी वसुली झाली. यामध्ये पक्षकारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा तालुका मुख्य  न्यायाधीश एम. सी. शेख  यांनी पक्षकारांना लोकअदालतीत जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढून वेळ आणि पैशाची बचत करण्याचे आवाहन केले. तसेच, दिवाणी न्यायाधीश एन एस सबनीस यांनी लोकअदालतीचे महत्त्व आणि फायदे समजावून सांगितले. या लोकअदालतीत मोटार अपघात, भू-संपादन, कौटुंबिक वाद, दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे, तसेच ग्रामपंचायत, नगरपालिका, बँक व महावितरण विभागाशी संबंधित खटलापूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. एकूण निकालः   ५,१०५,७८९ निकाली काढण्याची रक्कम आणि प्रलंबित (७०२९), हाती घेतलेले (४७३४) आणि निकाली काढलेले २३१
खटलापूर्वः या श्रेणीमध्ये ८,३९६,४४८ ची तडजोड रक्कम आणि प्रलंबित (२८१७), हाती घेतलेले (२८१७) आणि निकाली काढलेले (१२८) प्रकरणे या
खटल्यानंतरः या विभागात प्रलंबित (४२१२), हाती घेतलेले (१९१७) आणि निकाली काढलेले (१०३) प्रकरणे, ५,१०५,७८९  ची वसुली झाली आहे. सह दिवाणी न्यायाधीश एम सी शेख, दिवाणी न्यायाधीश एन एस सबनीस, पारनेर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. रवी गांधी तसेच उपाध्यक्ष ॲड. रामेश्वरी औटी, सचिव ॲड. अक्षय देशमाने, ॲड.एम एल औटी, ॲड. तराळ मॅडम ॲड. मोनिका सोनवणे, ॲड.सोनाली सोनावळे, ॲड. मनीषा सोमवंशी आदींसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पारनेर येथील दिवाणी न्यायालयात आयोजित केलेल्या लोकन्यायालयात कान्हुर पठार पतसंस्थेच्या तडजोडीस ठेवलेल्या प्रकरणांमध्ये मे कोर्टाने मार्ग काढून निर्णय दिला. या बद्दल मुख्य न्यायाधीश एम सी शेख  व एन एस सबनीस यांचा कान्हुर पठारचे  वसुली अधिकारी यांनी विशेष सत्कार केला.

Advertisement
Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *