Headlines

जि. प. प्रा. शाळा हिवरे कुंभार  येथे सचिन लोंढे गुरुजींकडून विद्यार्थ्यांना अनोखी भेट

पारनेर / भगवान गायकवाड,
           हिवरे कुंभार ता.शिरूर जिल्हा पुणे येथील प्राथमिक शाळेत नोकरी करत असलेले श्री. सचिन रघुनाथ लोंढे गुरुजी मूळ गाव भाळवणी ता.पारनेर यांनी  इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालानंतर ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या लाखभर बक्षिसांच्या रकमेला नकार देत ही सर्व बक्षिसांची रक्कम आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला. आपल्यावरील बक्षिसाची रक्कम आपल्या विद्यार्थ्यांवरच खर्च करून त्यांच्या आनंदात आपला आनंद शोधण्याचा प्रयत्न सचिन लोंढे गुरुजींनी केला. दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत विद्यार्थी आणणाऱ्या शिक्षकांना ग्रामस्थांकडून दुचाकी, चारचाकी वाहन घेण्यासाठी दीड ते दोन लाख पर्यंत रक्कम दिली जाते. यावर्षी मात्र हिवरे कुंभार शाळेतील शिक्षक सचिन लोंढे यांनी ही बक्षीस नाकारून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत आलेल्या 10 विद्यार्थ्यांना सायकली, तर थोड्या गुणांनी गुणवत्ता यादीपासून दूर राहिलेल्या 10 विद्यार्थ्यांना मनगटी घड्याळे, 22 विद्यार्थ्यांना स्टील बॉटल बक्षीस म्हणून देवून पाठीवर कौतुकाची थाप टाकली. आणि विशेष म्हणजे या शिल्लक राहिलेल्या रकमेत स्वतःची काही रक्कम टाकून शाळेतील सर्व 42 विद्यार्थ्यांना पुण्यात नेवून शैक्षणिक संस्कार करणारा ऊंबुटू चित्रपट दाखवला. शिवाय सर्वांना स्वखर्चाने चांगल्या हॉटेलला मेजवानी दिली. श्री सचिन लोंढे गुरुजींच्या या कृतीमुळे इंद्रायणी पतसंस्थेचे संस्थापक श्री सोपानराव लोंढे, श्री गोरक्षनाथ लोंढे, श्री योगेश लोंढे , प्रा. राजेंद्र लोंढे, श्री गंगाधर लोंढे गुरुजी, श्री दिनेश लोंढे, श्री किरण लोंढे, श्री सागर लोंढे, श्री डॉ शरद लोंढे, श्री रविंद्र लोंढे, श्री प्रमोद लोंढे तसेच लोंढे परिवारातील सर्व सदस्यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. त्याचप्रमाणे हिवरे कुंभार गावचे सामुदायिक सोहळ्याचे आयोजक विकास नाना गायकवाड, माजी सरपंच राहुल टाकळकर, माजी सरपंच विकास शिर्के,  रेवणनाथ गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थांसह शाळेतील सहकारी शिक्षक – शिक्षिका मुख्याध्यापक अंजना चौधरी, उपशिक्षक सुनिता पलांडे, शुकराज पंचरस, उपशिक्षक सुनिता पलांडे, शुकराज पंचरस, सुनील फंड, बाबाजी गोरडे, अश्विनी जाधव, एकनाथ खैरे आदी सर्वांनी त्यांचा सन्मान केला.

Advertisement
Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *