Headlines

दीपावलीच्या शुभेच्छेच्या बॅनरवर गुंडगिरी : धनंजय निमसे यांचा दीपावली शुभेच्छांचा बॅनर समाजकंटकांनी फाडला

पारनेर / श्रीनिवास शिंदे,

दीपावलीच्या निमित्ताने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तणाव वाढत असताना, कर्जुले रोडवरील कासारे फाटा येथे युवा उद्योजक धनंजय निमसे यांच्या दीपावली शुभेच्छांचा बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडला असल्याचा निंदनीय प्रकार घडला आहे. निमसे यांनी कासारे फाटा येथे लावलेला हा बॅनर त्याच रात्री अज्ञातांकडून फाडण्यात आला. यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून, मात्र धनंजय निमसे हे शांत व संयमी स्वभावाचे असल्याने या प्रकरणावर त्यांनी अद्याप कोणती प्रतिक्रिया दिली नाही.


धनंजयशेठ निमसे हे कासारे गावातील प्रमुख युवा नेते म्हणून ओळखले जातात. ते पंचायत समिती निवडणुकीत (२०२५)  कर्जुले हर्या गणामधून एक प्रबळ उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. दीपावलीच्या शुभेच्छांच्या निमित्ताने त्यांनी स्थानिक पातळीवर एक साधा बॅनर लावला होता, ज्यात ‘सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा’ असा संदेश होता. हा बॅनर कर्जुले रोडवरील कासारे फाटा या ठिकाणी संध्याकाळी लावण्यात आला. मात्र, रात्री उशिरा अज्ञात व्यक्तींनी तो फाडून टाकला. सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास ही घटना समोर आली. ग्रामस्थांनी बोलताना सांगितले की, “हे राजकीय द्वेषाचे प्रतीक आहे. धनंजय निमसे हे पंचायत समिती निवडणुकीसाठी कर्जुले हर्या गणातून एक प्रभावी उमेदवार असल्याने विरोधकांना त्यांची प्रगती खटकते. दीपावलीसारख्या सणाच्या काळात अशी गुंडगिरी चालवणे म्हणजे लोकशाहीला धक्का देणे आहे.”



ग्रामस्थांनुसार, निमसे हे गेल्या काही वर्षांपासून ग्रामविकासासाठी सक्रिय आहेत. ते रस्ते, पाणीपुरवठा आणि शाळा सुधारणा यावर भर देतात. यंदाच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ते पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या गणातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला असून, अनेकांनी निमसे यांच्या समर्थनार्थ एकत्र येण्याचा निर्णय घेतला.


पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली असून, तक्रार नोंदवली जाणार आहे.

धनंजय निमसे यांचे सहकारी अजित निमसे यांनी सांगितले की, “आम्हीं घाबरून जाणार नाही. उलट, ही घटना आमच्या उमेदवाराला अधिक बळकटी देईल. लोकांना लवकरच सत्य काय आहे ते समोर येईल.”

या प्रकरणाने दीपावलीच्या आनंदात राजकीय द्वेषाची काळी सावली पडली आहे. ग्रामस्थ आता धनंजय निमसे यांच्या बाजूने उभे राहिले आहेत आणि निवडणुकीत युवा नेतृत्व धनंजय निमसे यांचा विजय निश्चित आहे असा ग्रामस्थांचा ठाम विश्वास आहे.

Advertisement
Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *