शिक्री-ठाकरवाडी रस्त्याचे भूमिपूजन; आदिवासींना जातीचे दाखले वाटप
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर ढवळपुरी या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज राहतो या समाजाला मुख्य प्रवास आणण्यासाठी प्रयत्न करत असून सर्वसामान्य जनतेला व ग्रामीण भागाला विकासात्मक दिशा देण्यासाठी सत्तेच्या माध्यमातून काम करत असून या पुढील काळात सत्तेचा उपयोग जनतेच्या विकासासाठी करणार असल्याचे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केले.
वासुंदे येथील शिक्री ते ठाकरवाडी रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाला सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मंजुरी मिळाली. या रस्त्याच्या भूमिपूजन समारंभाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. हा रस्ता पूर्ण झाल्यास शिक्री, ठाकरवाडी, बोकनकवाडी लाखेवस्ती आणि परिसरातील आदिवासी वाडीवस्त्यांना जोडला जाईल, ज्यामुळे वाहतूक सुकर होऊन स्थानिकांना मोठा फायदा होईल.
कार्यक्रमादरम्यान, सुजित झावरे पाटील यांनी स्वखर्चातून शिक्री, ठाकरवाडी, बोकनकवाडी तसेच परिसरातील आदिवासी बांधवांना जातीचे दाखले वाटप केले. यामुळे आदिवासी समुदायाला शासकीय योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. तसेच, देवकृपा फाउंडेशनच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना फराळ वाटप करून दिवाळी सण साजरा करण्यात आला. या उपक्रमाने सणासोबत सामाजिक बंध मजबूत झाले.
समारंभाला वासुंदे व परिसरातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाइस चेअरमन, मान्यवर मंडळी आणि परिसरातील आदिवासी बांधव, महिला वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुजित झावरे पाटील यांच्या या प्रयत्नांना उपस्थितांनी कौतुक केले. हा कार्यक्रम विकास आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.
सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना जातीचे दाखले देण्यात आले त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ घेणे आदिवासी बांधवांना आता सोपे होणार आहे झावरे कुटुंबाने नेहमीच आदिवासी समाजाला भरभरून दिले असून विकास कामांच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवले आहे.
– आदिवासी नेते धोंडीभाऊ मधे (माजी पंचायत समिती सदस्य)



