पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा या प्रगतशील गावात विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली शाखा सुरू करण्यात आली. या ऐतिहासिक क्षणी तब्बल पन्नास लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन होऊन ग्रामविकासाच्या वाटचालीला नवा वेग मिळाला.
पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, मनपा नगरसेवक संदीप जऱ्हाड, सुभाष ठाणगे, दुध संघाचे चेअरमन संदिप ठुबे , मुरलीधर कावरे, महेश अडसूळ, गणेश कोरडे, सर्जेराव चौधरी, ज्ञानदेव कोरडे, कोंडिभाऊ कोरडे, काशिनाथ कावरे, नवनाथ अडसूळ, बाळू अडसूळ, जय कोरडे, विठल शिंदे, अंकुश अडसूळ, संजय कोरडे, ज्ञानदेव अडसूळ, अंबादास वाळुंज, सुदर्शन कोरडे, अंबादास कावरे, पानमंद सर, मयुर कोरडे, विजय वाळुंज, अनिल चौधरी यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्यात हिवरे कोरडा ग्रामस्थांना थेट लाभ होणाऱ्या तीन महत्त्वाच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यात मळगंगा मंदिर सभामंडप बांधकामासाठी दहा लाख रुपये, हिवरे कोरडा ते मांजरधाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी वीस लाख रुपये, तर हिवरे कोरडा ते पिराचा दरा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून आमदार काशिनाथ दाते सर यांच्या प्रमुख उपस्थितीत भुमिपूजन करण्यात आले.
या कामांच्या भूमिपूजनावेळी आमदार काशिनाथ दाते म्हणाले की, “हिवरे कोरडा हे गाव सामाजिक एकात्मता, प्रगतिशील विचारसरणी व विकासात्मक दृष्टिकोनासाठी संपूर्ण तालुक्यात आदर्श मानले जाते. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाखा सुरु झाल्याने कार्यकर्त्यांना एक नवे व्यासपीठ उपलब्ध झाले असून, संघटन अधिक बळकट होणार आहे. त्याचबरोबर गावच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल. शाखेच्या नूतन पदाधिकार्यांनी आपणास मिळालेल्या पदाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित असून जर एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असल्यास सनदशीर मार्गाने त्याच्या संरक्षणासाठी माझ्यासह संपूर्ण पारनेर तालुका राष्ट्रवादी परिवार त्याच्या सोबत राहील, त्याबाबत सर्वांनी निश्चिंत असावे परंतु राष्ट्रवादीच्या विचारांशी प्रतारणा करून पदाच्या जोरावर समाज विघातक काम करणाऱ्याला अजिबात अभय दिले जाणार नाही याचीही कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी.”
यावेळी ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण उत्सवी झाले होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून गावातील लोकांच्या एकजुटीचे व कार्यकर्त्यांच्या समर्पणासह आमदार काशिनाथ दाते यांच्या सर्वसमावेशक कार्यपद्धतीचेही कौतुक केले. तसेच पक्ष संघटन, सामाजिक सलोखा आणि विकासकामे या तिन्ही आघाड्यांवर हिवरे कोरडा हे गाव नेहमीच अग्रस्थानी राहील, असा विश्वास व्यक्त केला. हिवरे कोरडा गावात झालेल्या या कार्यक्रमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तालुक्यात नवी ऊर्जा मिळाली असून विकासाच्या संकल्पनांना ठोस दिशा मिळाल्याचे मत सर्वत्र व्यक्त होत आहे.
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत झालेल्या परिवर्तनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पक्ष संघटनेला बळकटी येत आहे. आमदार काशिनाथ दाते सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पक्ष संघटनेच्या बांधनी सोबतच सुसंस्कुत, सदाचारी व भयमुक्त समाजाची निर्मितीही करावयाची असून पक्षाची वा पक्षश्रेष्ठींची विचारधारा यापेक्षा वेगळी नाही.
▪️ प्रशांत गायकवाड, संचालक जिल्हा बँक
तालुक्यातील जनतेने हुकुमशाही मोडीत काढून ज्या अपेक्षेने आमदार काशिनाथ दाते सरांना निवडून दिले त्या अपेक्षा न मागता होणाऱ्या विविध विकासकामांच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत असून त्याचा हिवरे कोरडा गावचा एक गावकरी म्हणुन सार्थ अभिमान आहे. गावात सुरु होत असलेल्या शाखेच्या माध्यमातून समाजातील विविध स्तरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यात याव्यात व ग्रामास्थानीही आपलं हित लक्षात घेवून दाते सरांसारख्या शांत, संयमी व काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी राहील पाहिजे.
▪️ संदीप जऱ्हाड, मनपा नगरसेवक