Headlines

अजिक्य तारा दरेकर यांची पारनेर तालुका युवासेना प्रमुखपदी निवड

पारनेर / भगवान गायकवाड,

पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील युवक अजिक्य तारा दरेकर यांची शिवसेना पक्षाच्या पारनेर तालुका युवासेना प्रमुखपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र देताना शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन भाऊ जाधव, माजी महापौर संभाजी कदम, युवासेना जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, युवासेना जिल्हाप्रमुख आकाश कातोरे, महिला जिल्हाप्रमुख मिरताई शिंदे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर संजय शेंडगे आणि माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते  मनोज मुगसे आदी मान्यवर उपस्थित होते.

निवड झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना दरेकर म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे यांचे विचार युवकांपर्यंत पोहोचवून संघटन अधिक मजबूत करण्यासाठी काम करणार आहे. तसेच सुपा एमआयडीसीच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळावा यासाठी लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे.”

दरेकर यांच्या निवडीबद्दल  जिल्हाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार काशिनाथ दाते व संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Advertisement
Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *