Headlines

कारखाना बचाव समितीकडून अजित पवार गो – बॅक ची  घोषणा…!

आश्वासन न पाळल्याने पारनेर दौऱ्याला विरोध

पारनेर / भगवान गायकवाड,
     राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दि. २ ऑक्टोबरला दसरा मेळाव्याचे निमित्ताने  पारनेर दौऱ्यावर येत असल्याचे समजताच त्यांच्या नियोजित दौर्‍याला “अजित पवार – गो – बॅक  ”  आंदोलनाने विरोध  करण्याचा ईशारा पारनेर कारखाना बचाव समितीने दिला आहे. 
     याबाबत अधिक माहिती अशी की,  तालुक्यातील देवीभोयरे येथील सहकारी साखर कारखाना महाराष्ट्र  राज्य सहकारी बॅकेने बेकायदा विक्री केल्या प्रकरणी पारनेर न्यायालयाच्या आदेशानंतर  बॅकेचे दोन अधिकारी व पुण्याच्या  क्रांती शुगर  या खाजगी कंपनी विरोधात  पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  याबाबतचा  तपास सध्या चालु आहे. क्रांती शुगर हि खाजगी कंपणी असुन अजित पवार यांच्या निकटवर्तीयांची असल्याने  या प्रकरणी पारनेरकरांवरील झालेला अन्याय दुर करण्याचे आश्वासन गत वर्षी  निवडणुकांचे वेळी अजित पवारांनी पारनेरकरांना दिले होते.


कारखाना बचाव समितीने पारनेर तहसिलदार व पोलिसांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, गत वर्षी  दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणे कामी कारखाना बचाव समितीने त्यांच्या पक्षाचे  पारनेरचे  विधानसभा सदस्य काशिनाथ दाते  व  पक्षाचे  पदाधिकारी यांना वर्षभर वारंवार भेटून दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेची मागणी केलेली होती. परंतु,अजित पवार यांनी याबाबत कोणताही निर्णय अद्याप पर्यंत घेतलेला नाही.


तसेच कारखाना बचाव समितीने  शासनाला दिलेल्या कारखाना पुनर्जीवनाच्या प्रस्तावावर देखील कोणताही निर्णय घेतलेला नाही. अजित पवार यांच्या  शब्दावर विश्वास ठेवून पारनेरकरांनी त्यांच्या  पक्षाचे अधिकृत उमेदवार यांना विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी केलेले होते.  परंतु त्यानंतर आम्हाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे या प्रकरणी त्यांचे लक्ष वेधण्याकरिता पारनेर साखर कारखाना बचाव समितीने त्यांच्या नियोजित  पारनेर  दौऱ्यावेळी ” अजित पवार – गो बॅक “, “अजित पवार –  परत जा” असे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे.  हे आंदोलन आमच्या मागण्यांचे बाबत  लक्ष वेधण्याकरता करण्यात येणार असल्याची माहिती कारखाना बचाव समिती अँड. रामदास घावटे, बबनराव कवाद, साहेबराव मोरे यांनी दिली आहे.

Advertisement
Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *