प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्राचा सामाजिक उपक्रम
पारनेर / भगवान गायकवाड,
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा राबविला जात आहे. हा काळ राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाच्या औचित्याने निवडला गेला आहे. गांधीजींच्या सेवा भावाच्या तत्त्वज्ञानाचा आणि मोदींजीच्या विकासाभिमुख विचारांचा संगम साधणारा हा उपक्रम महाराष्ट्राच्या शासन प्रशासनाला लोकाभिमुख, कार्यक्षम आणि अधिक पारदर्शक करण्याच्या दिशेने एक एतेहासिक टप्पा ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पारनेर केंद्राच्या वतीने आणि ब्रह्माकुमारी साधना दिदी यांच्या संकल्पनेतून ‘ नशा मुक्ती भारत अभियान ‘ राबविण्यात आले. या सामाजिक उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेर नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्षा आणि अर्थ व बांधकाम समितीच्या सभापती सुरेखाताई भालेकर होत्या तर प्रमुख उपस्थिती मध्ये उपक्रमशील शिक्षका मीरा पुजारी, विनायक विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका शोभना बांदल, साधक रामभाई, देवराम ढोले, गाढवे, हिराबाई मगर, जबाजी खोडदे, रवी खोडदे, देवराम खोडदे, लताबाई खोडदे, गजराबाई औटी,आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते द्वीप प्रज्वलित करून उपक्रमास प्रारंभ करण्यात आला.

यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयचे समन्वयक साधना दिदी यांनी उपस्थित सर्व साधक यांच्याकडून नशा मुक्ती अभियानात निर्व्यसनाची प्रतिज्ञा वदवून घेतली. व्यसनमुक्ती अभियान हे केवळ व्यसनाधीन व्यक्ती साठी नाही तर संपूर्ण समाजाला निरोगी आणि सुरक्षित बनण्यासाठी महत्वाचे आहे.आजच्या धकाधकीचे जीवनात मनुष्य ताणतणाव आणि मानसिक समस्यांनी ग्रासला आहे त्यामुळे बहुतांश लोक व्यसनाच्या आहारी गेले आहेत. परिणामी त्या व्यसंनधारी मनुष्याचे कुटुंब आणि समाज यांना परिणाम भोगावे लागत आहेत. व्यसनाने शरीराची हानी होत आहे तसेच आर्थिक परिणामांना सामोरे जावे लागते. त्यामुळेच प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्यामार्फत नशा मुक्त भारत अभियान हे भारत देशात नशा आणि व्यसनाच्या विरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी चालविले जाते.


सूत्रसंचालन देवराम ढोले यांनी केले तर आभार ईश्वरीय परिवाराने मानले..



