Headlines

पारनेर ग्रामीण पतसंस्थेतर्फे सभासदांना दहा टक्के लाभांश

संस्थापक, चेअरमन तथा आ. काशिनाथ दाते सर यांची माहिती

पारनेर / भगवान गायकवाड,

  पारनेर ग्रामीण पतसंस्थेची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी संस्थापक, चेअरमन आ. काशिनाथ दाते सर यांचे अध्यक्षतेखाली मणकर्णिका लॉन्स पारनेर येथे संपन्न झाली. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन सुरेश बोरुडे सर, संचालक बाळासाहेब सोबले, आर एस कापसे सर, लक्ष्मण डेरे, मयूर गांधी, अर्जुन गाजरे, राजेंद्र औटी, कृष्णा उमाप, सुभाष राठोड, दिलीप दाते, सुनील गाडगे, सौ सुनंदा दाते, सौ आशा तराळ तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात उपस्थित होते. संस्थेच्या सुरुवातीला अहवाल सालात विधानपरिषद सदस्य आ. स्व. अरुण काका जगताप, अतिवृष्टी पूरपरिस्थिती मुळे मृत्युमुखी पडलेले नागरिक व संस्थेचे ज्ञात, अज्ञात सभासद दिवंगतांना श्रद्धांजली देण्यात आली. त्यानंतर संस्थेला सन २०२४ – २५ या आर्थिक वर्षात रुपये २ कोटी ५० लाख ९५ हजार ९२० निव्वळ नफा व ऑडिट वर्ग “अ” मिळाल्याचे पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा संस्थापक अध्यक्ष काशिनाथ दाते सर यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सांगितले, संस्थेकडे २२ वर्षाच्या कालावधीत आज अखेर २३५ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झालेल्या आहेत हे सभासदांनी संस्थेवर ठेवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. संस्थेची बँक गुंतवणूक १०७ कोटी असून स्थावर मालमत्ता ३ कोटी ८० लाख आहे, संस्थेमार्फत सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला, सभासदांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व व्यवसायासाठी १५२ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केलेले आहे. संस्थेमार्फत नियमित कर्ज हप्ता भरणाऱ्या १०५ कर्जदार सभासदांचा सन्मान चिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

संस्थेचे अहिल्यानगर, पुणे, ठाणे व मुंबई जिल्हा कार्यक्षेत्र असून संस्थेच्या पारनेर, टाकळी ढोकेश्वर, आळकुटी, बेलवंडी फाटा, जामगाव, नारायणगव्हाण, आळेफाटा, सुपा, कामोठे, अहिल्यानगर, वनकुटे, ढवळपुरी, भोसरी, खडकवाडी, मांडवे खुर्द, पळशी व शिरूर अशा १७ शाखा सुरू आहेत. संस्थेचे चेअरमन काशिनाथ दाते यांनी सांगितले संस्थेच्या पारनेर, टाकळी ढोकेश्वर, जामगाव, कामोठे, खडकवाडी, आळेफाटा, शिरूर व सुपा येथे स्वमालकीच्या इमारती आहेत. संस्थेने पारनेर, टाकळी ढोकेश्वर, आळकुटी, सुपा, बेलवंडी फाटा, जामगाव, ढवळपुरी येथे सभासदांना लॉकर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले व सभा खेळीमेळीत संपन्न झाली.

वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी विकास बेगडे पाटील, रामदास दाते, ॶॅड युवराज पाटील, डॉ. प्रदीप दाते, मंगेश दाते, नियाज राजे,मंगेश कुऱ्हाडे, बाळशीराम कुऱ्हाडे, शरद शिरोळे, संभाजी शिरोळे, बाळासाहेब काकडे, परसराम शेलार, विकास रोकडे, अमोल रोकडे, धनंजय शिंदे, धनंजय ढोकळे, शिवाजी पानसरे, संभाजी मगर, तुकाराम दरेकर, डॉ. उत्तम थोरात, बाबासाहेब दाते, नवनाथ शिरोळे, आबासाहेब मते, काशिनाथ औटी, भानुदास सोनलकर, संतोष मते, सुनील औटी, सोनाबाई चौधरी, डॉ. सुभाष डेरे, अशोक खैरे, बाबाजी थोरात, विठ्ठल कावरे, किरण शिंदे, देविदास साळुंके, चंदन मापारी, अश्विन कोल्हे, वसंत थोरात, संजीव येवले, अनिल गाडगे, किशोर शहाणे, प्रकाश चिकणे, बाबाजी लांडगे, सोपान कुऱ्हाडे, राहुल मोटे, बाळासाहेब राक्षे, मच्छिंद्र यादव, रमेश अबुज, बाबा जवक, संजय गुंड, डॉ. जयसिंग दिवटे यांच्यासह संस्थेचे सभासद उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन आर एस कापसे यांनी केले. व्हा. चेअरमन सुरेश बोरुडे यांनी आभार मानले. यावेळी सभासद व कर्मचारी उपस्थितीत होते, सभासदांना संस्थेमार्फत मिष्टांन्न भोजन सभा संपल्यानंतर देण्यात आले.

Advertisement
Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *