पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची भर म्हणून ‘आशीर्वाद सुपर मार्केट’चा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला. पारनेरच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू झालेल्या या सुपर मार्केटमुळे परिसरातील नागरिकांची दैनंदिन गरजेची खरेदी आता अधिक सोयीस्कर होणार आहे.
या बहुप्रतिक्षित सुपर मार्केटचे उद्घाटन पारनेर नगर विधानसभा सदस्य आमदार काशीनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव चेडे, गणपत अंबुले (सर), नगरसेवक अशोक चेडे, हसन राजे, धोंडीभाऊ पुजारी, रफिक शेख, शकील शेख, सखाराम औटी, अरुण गाडगे, मंगल गाडगे,रामदास दाते, राजेंद्र औटी, वसंतराव गाडगे, नियाज राजे, किसन गंधाडे, किरण कुबडे, रियाज राजे, प्रवीण साळवे, अश्विन कोल्हे, सचिन शेटे, सलीम राजे, रशीद शेख, अनिल गाडगे, प्रशांत गाडगे, विलास गाडगे, शिवाजी दाते, प्रमोद गाडगे,भास्कर गाडगे, वसंत गाडगे, अरुण गाडगे, विक्रांत गाडगे, युवराज गाडगे,अशोक गाडगे, नवनाथ गाडगे, प्रमोद गाडगे, गोपी गाडगे, अशोक गाडगे, किशोर शहाणे, विठ्ठल कावरे, गिरीश साळवे,नवनाथ गाडगे, ज्ञानेश्वर औटी.आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी आमदार दाते सर यांनी सुपर मार्केटच्या गाडगे परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. “पारनेर शहराची वाढती गरज लक्षात घेता ‘आशीर्वाद सुपर मार्केट’ हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे ग्राहकांना एकाच छताखाली उत्तम दर्जाचे आणि वाजवी दरातले सर्व साहित्य उपलब्ध होईल,” असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, त्यांनी सुपर मार्केटमुळे स्थानिक स्तरावर रोजगार निर्मितीस मदत होईल, अशी आशाही व्यक्त केली.
यावेळी शहर आणि तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, व्यावसायिक, राजकीय नेते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्केटच्या परिसरात ग्राहकांसाठी उत्तम व्यवस्था, प्रशस्त जागा
‘आशीर्वाद सुपर मार्केट’मध्ये दैनंदिन किराणा माल, घरगुती वापराच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधने आणि इतर अनेक गोष्टी उत्कृष्ट दर्जाच्या आणि सवलतीच्या दरात उपलब्ध असणार आहेत. पारनेरकरांना आधुनिक आणि आनंददायी खरेदीचा अनुभव देण्यासाठी हे सुपर मार्केट सज्ज झाले आहे.
या उद्घाटन सोहळ्यामुळे पारनेर शहराच्या व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात एक नवा उत्साह संचारला आहे.



