पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा गटेवाडी येथे शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये भर घालणारा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कन्हैया ऍग्रो कंपनीच्या सेस फंडातून शाळेसाठी वॉल कंपाऊंड आणि टॉयलेट बांधकाम प्रकल्पाचा भूमिपूजन शुभारंभ नुकताच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला.
कन्हैया ऍग्रो कंपनीचे कार्यकारी संचालक सुरेश पठारे यांच्या शुभहस्ते हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. शाळेच्या सुरक्षिततेसाठी वॉल कंपाऊंड आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या स्वच्छतागृहांच्या (टॉयलेट) बांधकामामुळे शाळेला नवा आणि अधिक सुरक्षित चेहरा मिळणार आहे.
याप्रसंगी तालुका दूध संघाचे माजी मॅनेजर द्यानदेव गट, सरपंच मंगल गट, उपसरपंच किरण गट, माजी सरपंच गवराम गट, तसेच संदीप गट, उत्तम गट, राजेंद्र गट, संजय पवार, राजाराम डावखर, चंद्रकांत गट, राहुल डावखर, रावसाहेब गट, सखाराम गट, नामदेव गट, गीताराम गट, सदाशिव गट, गणेश गट, भगवान गट, गोरक्ष गट, गणेश पवार, सुनील गट, बाळासाहेब ठाणगे, राहुल सकट, यश गट, सुहास डावखर, सिद्धेश गट, दत्तात्रय काळोखे, बबन दरेकर यांसह विद्यार्थी आणि गटेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सरपंच सौ. मंगल चंद्रकांत गट यांनी कन्हैया ऍग्रो कंपनीचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, “पारनेर तालुक्यातील गटेवाडीसारख्या छोट्या खेडेगावातून सुरू झालेली कन्हैया ऍग्रो कंपनी आज केवळ राज्यातीलच नव्हे, तर देशातील एक अग्रगण्य कंपनी बनली आहे. गाव खेड्यातील तरुण उद्योगात उतरला तर तोही प्रगती करू शकतो, हे या कंपनीने सिद्ध केले आहे. ही समस्त गटेवाडी ग्रामस्थांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.”
कन्हैया ऍग्रो कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत सेस फंडातून केलेल्या या मदतीमुळे गटेवाडी शाळेचे रूप पालटण्यास मदत होणार आहे.



