Headlines

पत्रकार श्रीनिवास शिंदे

सैन्य दलात विकास करंजुले बनले नायब सुभेदार: पाडळी रांजणगावचा सुपुत्र नावारूपाला!

पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील सुपुत्र विकास (माऊली) शिवाजी करंजुले यांनी भारतीय सैन्य दलात ‘नायब सुभेदार’ या महत्त्वपूर्ण पदावर पदोन्नती मिळवून गावचा आणि तालुक्याचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल नुकताच गावी परतल्यावर डी.बी. (आण्णा) करंजुले मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला. ब्रिटनिया डेअरीचे चेअरमन नितीन साठे आणि…

Read More

जातेगाव परिसरात बिबट्याची दहशत: नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पारनेर / भगवान गायकवाड,        पारनेर तालुक्यातील जातेगाव परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः राळेगण सिद्धी रोडवरील खोमदरा भागात बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले असून, कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी वनविभागाने तातडीने पिंजरा लावून या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.स्थानिक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राळेगण…

Read More

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक : प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

१४ ऑक्टोबरपर्यंत हरकती, सूचना लेखी सादर करण्याचे आवाहन  अहिल्यानगर, जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी  १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीमधून प्रारुप मतदार यादी तयार करण्यात येऊन ती ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत संबंधित तहसील कार्यालयात लेखी सादर…

Read More

पारनेर कारखाना बचाव समिती व भुमिपुत्र शेतकरी संघटनेची सहकारमंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक संपन्न

आमदार काशिनाथ दाते सरांची यशस्वी मध्यस्थी पारनेर / भगवान गायकवाड, बुधवार दि. ८ आक्टोबर २०२५ पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या पुढाकाराने पारनेर साखर कारखाना बचाव समिती व भुमिपुत्र शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक मंगळवारी ७ आक्टोबर रोजी मुंबई येथे संपन्न झाली. या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री मा. नामदार बाबासाहेब पाटील प्रमुख…

Read More

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पारनेर तालुकाध्यक्ष पदी अविनाश मुरलीधर पवार यांची नियुक्ती

 पारनेर / भगवान गायकवाड,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पारनेर तालुकाध्यक्षपदी अविनाश मुरलीधर पवार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.मनसे अध्यक्ष सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच पक्षाचे नेते मा. बाळा नांदगावकर व  माथाडी कामगार सेना अध्यक्ष सचिन गोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष श्री सचिन डफळ साहेब यांच्या हस्ते ही नियुक्ती पार पडली. नवीन तालुकाध्यक्षपदी निवड…

Read More

कोल्हापूर याठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची महामंडळ सभा उत्साहात संपन्न

पारनेर / भगवान गायकवाड,         सर्वच खात्यातील कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य सुविधा लागू करण्यात आलेल्या आहेत, त्याचप्रमाणे शिक्षकांनाही कॅशलेस आरोग्य सुविधा लागू करण्याचे आश्वासन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री  प्रकाश आंबीटकर यांनी दिले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कोल्हापूर येथे झालेल्या महामंडळ सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  सर्वोच्च न्यायालयात टीइटी संदर्भात दिलेला निर्णय शिक्षकांच्यावर अन्याय करणारा…

Read More

“केमियाड परीक्षेत श्री ढोकेश्वर कॉलेजच्या विद्यार्थिनींना यश”

टाकळी ढोकेश्वर/ प्रतिनिधी, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्री ढोकेश्वर कॉलेज टाकळी ढोकेश्वर येथील प्रथम वर्ष विज्ञान या वर्गातील रसायनशास्त्र या विषयाच्या केमियाड या परीक्षेत यश संपादन केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दरवर्षी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टी विकसित व्हावी तसेच रसायनशास्त्र विषयात विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून केमियाड या परीक्षेचे आयोजन करत असते….

Read More

अभिजात मराठी भाषा सप्ताहात ‘वर्तमानातील कृती’वर जोर

पारनेर / भगवान गायकवाड, मराठी भाषेचा सन्मान आणि गौरवशाली वारसा टिकवण्यासाठी केवळ भूतकाळात न रमता वर्तमानात सक्रिय कृती करणे आवश्यक आहे, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व भाषा अभ्यासक प्रा. डॉ. विजय काळे यांनी केले. न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, पारनेर येथे ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’ निमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. ‘मराठी…

Read More

भाषा माणसांना जोडण्याचे काम करते. : डॉ. ॠचा शर्मा

टाकळी ढोकेश्वर/ प्रतिनिधी, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्री ढोकेश्वर कॉलेज, टाकळी ढोकेश्वर. मध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुखातिथी म्हणून डॉ. ॠचा शर्मा यांनी भाषा ही माणसांना जोडण्याचे काम करत असून ते संवादाचे एक उत्तम साधन आहे.  हिंदी ही राष्ट्रभाषा असून भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत या भाषेने महत्त्वाची भूमिका बजावली. आपण…

Read More

पारनेरचे नगराध्यक्षपद ओबीसीं साठी राखीव!

पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. सोमवारी झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये पारनेरचे नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी )या गटासाठी आरक्षित झाले आहे.या आरक्षणामुळे आता ओबीसी समाजातील व्यक्तींना पारनेरचे नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. नगराध्यक्षपदासाठी ही सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली असून, राजकीय पक्षांमध्येही हालचाली…

Read More