Headlines

पत्रकार श्रीनिवास शिंदे

‘श्री छत्रपती प्रतिष्ठान’ मतिमंद मुलांची कृषी कार्यशाळेच्या विशेष मुलांच्या पणती खरेदीतून यंदाचा दीपोत्सव साजरा करा!

पणती खरेदीतून मतिमंद मुलांना प्रोत्साहन आणि आधार द्या; अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन पारनेर / भगवान गायकवाड, दिवाळी हा दिव्यांचा, उत्साहाचा आणि आनंदाचा सण. यावर्षीचा तुमचा दीपोत्सव अधिक अर्थपूर्ण आणि खास होऊ शकतो. तो साजरा करा श्री छत्रपती प्रतिष्ठान संचलित मतिमंद मुलांची कृषी कार्यशाळा , शिक्रापूर येथील विशेष मुलांनी आपल्या हातांनी बनवलेल्या सुंदर पणत्या खरेदी करून….

Read More

पारनेर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विद्यापीठ आयोजित जल्लोष स्पर्धेत उत्तुंग भरारी

चार सुवर्णपदक व तीन रौप्य पदकावर कोरले नाव पारनेर / भगवान गायकवाड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व सांस्कृतिक विभाग आयोजित जल्लोष 2025 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, लोणीकंद पुणे व राज्यस्तरीय अंतिम सांस्कृतिक स्पर्धा अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, संगमनेर या ठिकाणी एकूण सत्तावीस कला प्रकारांची स्पर्धा…

Read More

३५० शेतरस्त्यांची नोंद ७/१२ वर – डॉ. चिंचकर यांचे पारनेर तहसीलदारांना आदेश

पारनेर / भगवान गायकवाड, महाराष्ट्र शासनाने दि. २२ मे २०२५ रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेश क्र. मीन–२०२५/प्र.क्र.४७/वि–१अ नुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी कायदेशीर रस्ता मिळण्याचा हक्क आहे. या आदेशानुसार मंजूर रस्त्यांची नोंद ७/१२ उताऱ्यावर “इतर हक्क” या तक्त्यात करणे बंधनकारक आहे. पारनेर तहसीलच्या ३५० प्रकरणांवर कार्यवाही सोबत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातील गाव निहाय सिमांकन…

Read More

पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी डॉ. संजय ओक; महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार २०२५ स्मिता व रवींद्र कोल्हे दांपत्याला जाहीर

पारनेर / भगवान गायकवाड, रुग्ण हक्क परिषद, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय, मुंबई आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे आरोग्य महोत्सव आणि पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचे उद्घाटन येत्या १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे….

Read More

मौलाना आझाद महामंडळव निधी साठी राम रहीम प्रतिष्ठानची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

पारनेर / भगवान गायकवाड,      उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पारनेर दौऱ्यादरम्यान, राम रहीम बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी (अहिल्यानगर) जिल्ह्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली.प्रतिष्ठानचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते रफिक शेख मेजर यांनी स्वतः उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या आशयाचे निवेदन सादर केले. अल्पसंख्याक समाजातील गरजू व्यक्ती आणि उद्योजकांसाठी…

Read More

स्वावलंबी संस्थांकडूनच शाश्वत विकास शक्य: रवी नगरकर

अहिल्यानगर / भगवान गायकवाड, पारनेर, सरकारी अनुदाने किंवा कॉर्पोरेट सामाजिक दायित्वातून (CSR) मिळणारा आर्थिक सहयोग हा अनिश्चित असतो. त्यामुळे स्वावलंबी सामाजिक संस्थांमधूनच शाश्वत सामाजिक विकास शक्य आहे, असे स्पष्ट प्रतिपादन कल्याणी टेक्नोफोर्जचे व्यवस्थापकीय संचालक रवी नगरकर यांनी आज केले. कल्याणी टेक्नोफोर्जच्या सहकार्याने स्नेहालय संस्थेच्या इसळक (जि. अहिल्यानगर) येथील हिंमतग्राम प्रकल्पात उभारण्यात आलेल्या संरक्षित शेती प्रकल्पाच्या…

Read More

धोत्रे खुर्द गावातील दोनशे महिलांना मोफत देवदर्शन..

पारनेर /प्रतिनिधी धोत्रे खुर्द येथील यश भैय्या रहाणे मित्रमंडळाच्या वतीने दोनशे महिलांना मोफत देवदर्शन यात्रेचे नुकतेच आयोजन केले होते. नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून एक दिवस हक्काचा माझ्या माता भगिनींचा हा उपक्रम यावर्षी राबविण्यात आलेला आहे धोत्रे खुर्द – रांजणगाव गणपती – कवठे यमाई माता – निघोज मळगंगा माता येथे २ बसेस व १० चार चाकी…

Read More

पूरग्रस्तांसाठी पारनेर ग्रामीण पतसंस्थेची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाखाची मदत

पारनेर / भगवान गायकवाड, राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे पिकांचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी पारनेर ग्रामीण पतसंस्थेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपये देणगी दिली आहे. समाजाप्रती असलेल्या बांधिलकीतून पतसंस्थेने हा मदतीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्यासाठी असलेला एक लाख रुपयांचा धनादेश पतसंस्थेच्या…

Read More

डॉ. के.आर. हांडे यांच्या “गबली” कादंबरीचा प्रकाशन सोहळा वडझिरे मध्ये!

पारनेर / भगवान गायकवाड, प्रफुल्लता प्रकाशन, पुणे यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या डॉ. के.आर. हांडे लिखित “गबली” या कादंबरीचा प्रकाशन सोहळा शनिवार, दि. ४ रोजी पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५.३० वाजता कृष्णलीला मंगल कार्यालय, वडझिरे येथे हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे.या प्रकाशन सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. डॉ. प्रकाश गरुड…

Read More

कन्हैया ऍग्रो कंपनीच्या सेस फंडातून जि. प. प्राथमिक शाळा गटेवाडीसाठी वॉल कंपाऊंड आणि टॉयलेट सुविधा

पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा गटेवाडी येथे शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये भर घालणारा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कन्हैया ऍग्रो कंपनीच्या सेस फंडातून शाळेसाठी वॉल कंपाऊंड आणि टॉयलेट बांधकाम प्रकल्पाचा भूमिपूजन शुभारंभ नुकताच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला.कन्हैया ऍग्रो कंपनीचे कार्यकारी संचालक सुरेश पठारे यांच्या शुभहस्ते हा भूमिपूजन…

Read More