पारनेर शहरातील जयभवानी गणेश मित्र मंडळाचा लाडक्या बाप्पाला निरोप


पारनेर / भगवान गायकवाड,


   पारनेर शहरातील लाल चौकात गेल्या दहा दिवसापूर्वी जयभवानी गणेश मित्र मंडळाने आकर्षक गणेशाची मूर्ती विराजमान केली होती.यावेळी काचेचा महाल आकर्षक देखावा करण्यात आला होता तर विद्युत रोषणाईंनी लाल चौक परिसर उजळून निघाला होता.अशा या दहा दिवसाच्या उत्साहवर्धक गणेशोत्सवानंतर मानाच्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप दिला. सालाबाद प्रमाणे शिस्तप्रिय मंडळ म्हणून या गणेश भक्तांची परंपरा आहे.या लाडक्या बाप्पाला पारंपरिक पद्धतीने निरोप देण्यात आला. सकाळी गणेश भक्तांनी विधवत पूजा व आरती करून गणेशाची सजवलेल्या रथातून मिरवणूक काढली होती. यावेळी मित्र मंडळाच्या तरुणाईचा उत्साह डोळ्याचे पारणे फेडणारा होता.


    सालाबाद प्रमाणे  जयभवानी गणेश मित्र मंडळाची डिजे मुक्त पारंपरिक पद्धतीने मिरवणूक आकर्षक ठरली. पारनेर शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या गणेश मंडळाने मिरवणूक लेझिम पथक, ढोल, ताशे सह शहरातील शिवाजी पेठ मार्गावरून वाजत गाजत काढली होती. मिरवणूक शिवाजी पेठेतून वरची वेशीजवळ असलेल्या पारंपरिक बारवे मध्ये गणेशाचे विसर्जन करण्यात येते त्या ठिकाणी गणेश भक्तांनी गणेशाची अखेरची पूजा व आरती करून गणेशाला अखेरचा निरोप दिला.

Advertisement
Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *