स्वर्गीय महादू कृष्णाजी घुले यांनी संस्कारक्षम पिढी घडवली : ह. भ. प. विशाल महाराज खोले
अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
पिंपळगाव रोठा येथे प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने किर्तन सोहळा
पारनेर/प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी जपत जीवन जगलेले स्वर्गीय महादू कृष्णाजी घुले (आप्पा) यांनी आपल्या जीवन काळात सर्वसामान्य समाजाला न्याय देण्याची भूमिका ठेवली. समाजकारणात तत्वनिष्ठ राहून सेवा केली व त्यांनी खऱ्या अर्थाने संस्कारक्षम पिढी घडविली असे गौरव उद्गार स्वर्गीय महादू कृष्णाजी घुले यांच्या प्रथम पुण्यस्मरण किर्तन सोहळ्याच्या निमित्ताने कीर्तनकार ह भ प विशाल महाराज खोले यांनी काढले.
तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथे राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस माजी सरपंच अशोकराव घुले व उद्योजक सुभाष घुले यांचे वडील व कोरठण खंडोबा देवस्थानच्या अध्यक्षा शालिनीताई अशोक घुले यांचे सासरे स्वर्गीय महादू कृष्णाजी घुले (आप्पा) यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम राहत्या घरी राधाकृष्ण निवास पिंपळगाव रोठा येथे किर्तन सोहळ्याच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला अध्यात्मिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके, यांच्यासह ह भ प अक्रूर महाराज साखरे, ह भ प प्रकाश महाराज साठे, ह भ प शिवानंद महाराज शास्त्री, ह भ प पद्माकर महाराज देशमुख, ह भ प कविराज महाराज झावरे, राष्ट्रवादीचे नेते दीपक लंके, शिक्रापूर माजी सरपंच पै. रामभाऊ सासवडे, पारनेर राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा सुवर्णाताई घाडगे, कोरठण खंडोबा देवस्थानचे उपाध्यक्ष महेश शिरोळे, कोरठण खंडोबा देवस्थानचे सचिव चंद्रभान ठुबे, खजिनदार कमलेश घुले, विश्वस्त अजित महांडुळे, भाऊसाहेब गाडगे, विश्वस्त सुरेश फापाळे, उद्योजक राजेंद्र नवले, संतोष गुंजाळ, प्रवीण नाईक, राष्ट्रवादीचे नेते मोहनराव रोकडे, राष्ट्रवादी नगर शहराध्यक्ष प्रकाश पोटे, बापूसाहेब शिर्के, नितीन चिकणे, सुरेश ढवन, उद्योजक सचिन गोडसे, अशोक वाफारे, संदीप चौधरी, निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रवींद्र राजदेव, उपसरपंच प्रसाद नवले, उद्योजक प्रकाश चिकणे, जितेश सरडे, अमित जाधव, उद्योजक दत्तात्रय साळुंके, दादाभाऊ चिकणे, किशोर गायकर, बाळासाहेब पुंडे, सोमनाथ वरखडे, गुंडाशेठ भोसले, माजी सरपंच साहेबराव वाफारे, भाऊ साठे, कारेगाव सरपंच बापू ठुबे, संपत ठुबे, उद्योजक भगवान वाळुंज, आदी मान्यवर व पिंपळगाव रोठा येथील सरपंच, उपसरपंच सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन गावातील इतर पदाधिकारी ग्रामस्थ तसेच पुणेकर, मुंबईकर, मंडळी कोरठण खंडोबा देवस्थानचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी माजी सरपंच अशोक घुले मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनीच स्वतः उपस्थितांचे आभार मानत ते असे म्हणाले की हा पुण्यस्मरण कार्यक्रम माझ्या घरातीलच कार्यक्रम असून मी उपस्थितांचे आभार मानतो.
पिंपळगाव रोठा येथे शिवस्मारकासाठी घुले पाटील बंधूंची देणगी
छत्रपति शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून पिंपळगाव रोठा येथील शिवस्मारक व प्रवेशद्वार उभारणीच्या कार्य सुरू आहे. नवी मुंबईतील उद्योजक पिंपळगाव रोठा गावचे माजी सरपंच अशोक घुले आणि सुभाष घुले यांनी आपल्या वडिलांच्या, स्वर्गीय कै. महादू कृष्णाजी घुले पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १,२१,१११/- रुपये देणगी दिली आहे ६ जून २०२५ रोजी जाहीर केलेला शब्द खरा करत, त्यांनी ही रक्कम समितीकडे सुपूर्द केली. या योगदानाने शिवकार्य गतिमान झाले असून, ग्रामस्थांनी त्यांच्या दानशीलतेचे कौतुक केले.
वडिलांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमा निमित्ताने अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांना बोलवून एक आध्यात्मिक वैचारिक व्यासपीठ तयार करण्याचा अशोकराव घुले व घुले कुटुंबाने प्रयत्न केला आहे पुण्यस्मरण निमित्ताने अध्यात्मिक सामाजिक बांधिलकी जपली गेली आहे.
– निलेश लंके (खासदार)