वीस बुथ प्रमुख, 100 मतदार यादी प्रमुख नियुक्ती करणार
पारनेर / भगवान गायकवाड,
भाजप ने दिड वर्षा नंतर होणा-या पारनेर नगरपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून तब्बल वीस बुथ प्रमुख व १०० यादी प्रमुख नियुक्ती करण्यात येणार आहे. भाजपचे युवा नेतृत्व कल्याण थोरात यांची मंडल चिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या कडे बुथ प्रमुख नियुक्ती ची जबाबदारी देण्यात आली आहे.
पारनेर शहरात सध्या भाजपचे अशोक चेडे एकमेव नगरसेवक आहेत. भाजप ने पारनेर नगरपंचायत साठी भाजपने वरीष्ठ पातळीवरून मोहीम हाती घेतली असून यासाठी मंडल अध्यक्ष राहुल शिंदे यांच्या सह भाजप नेत्यांनी शहरात पक्ष संघटना वाढीसाठी भर दिला आहे. पारनेर मधील भाजपचे युवा नेतृत्व कल्याण थोरात यांची पारनेर तालुका मंडल चिटणीस नियुक्ती केली असून त्यांच्या कडे भाजप बुथ प्रमुख व मतदार यादी प्रमुख नियुक्ती करण्यास सांगितले आहे.
भाजपचे पारनेर शहरात एकच नगरसेवक आहेत. आगामी निवडणुकीत पारनेर नगरपंचायत मध्ये भाजपला आणखी बळकट करण्यासाठी पक्षवाढी साठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
– राहुल शिंदे,मंडल अध्यक्ष पारनेर
माझे वडील रामदास अण्णा थोरात यांच्या कडे पुर्वी भाजप पक्ष संघटना जबाबदारी होती. त्यांनी निष्ठेने भाजपचे काम केले मलाही भाजपने मंडल चिटणीस जबाबदारी देऊन पक्षाचे काम करण्याची संधी दिली. पारनेर मधील जेष्ठ, निष्ठावंत यासह युवकांना सर्वांच्या संमतीने बुथ प्रमुख, मतदार यादी प्रमुख नियुक्ती करण्यात येणार आहे.
– कल्याण थोरात,मंडल चिटणीस भाजपा



