पारनेर / भगवान गायकवाड,
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था व व्यक्तींना साप्ताहिक वादळी स्वातंत्र्यच्या वर्धापन दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या “वादळी सन्मान पुरस्कार २०२५” चे रविवार दि. ५ ऑक्टोबर २०२५ ला वितरण करन्यात येणार असल्याची माहिती साप्ताहिक वादळी स्वातंत्र्यचे संपादक जितेंद्र पितळे यांनी दिली.
या वर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारात प्रामुख्याने सामाजिक क्षेत्रातील श्री गोरक्षनाथ ओहळ, (सर) लोणी , प्राचार्या सौ. माधुरी प्रमोद काकडे (दौंड) , केरबा घोडके (पेडगाव) ,गोकुळदास कोपनर (पुणे), सुनील पवार (दौंड), चंद्रकात रहिंज (सर) काष्टी, कृषी क्षेत्रातील विजयबापु मोकाशी (इनामगाव), ज्ञानदेव लाढाने (बेलवंडी), दत्तात्रय हिरडे. श्रीगोंदा, पत्रकारीता क्षेत्रातील अमोल झेंडे (श्रीगोंदा) दत्ता पाचपुते. (काष्टी) भगवान गायकवाड. (पारनेर), सोहेल शेख (श्रीगोंदा.), गणेश जेवरे. (कर्जत.) विधी सेवा क्षेत्रातील ॲड आशीष सुसरे. (अहिल्यानगर) ॲड. जुबेर शेख (श्रीगोंदा ) अँड. संदीप भोईटे (सांगवी. दु ), सहकार क्षेत्रातील राजेंद्र नीलकंठ नागवडे (वांगदरी) ओमराजे बोत्रे पाटील (मांडवगण) मिठूशेठ शिंदे (मढेवडगाव). शिक्षण क्षेत्रातील सौ. पल्लवी शिंदे (थेटेवाडी श्री प्रमोद शिर्के (हंगेवाडी,श्री नितीन भोईटे (श्रीगोंदा) सौ. सुनीता लोखंडे (कोथिंबिरे मळा श्रीगोंदा),श्री संतोष सोनवणे (सिद्धार्थ नगर श्रीगोंदा) श्री राजेंद्र माने (पारगाव सुद्रिक) श्री शरद तरटे सर (जि.प.प्रा शाळा खेतमाळीस मळा श्रीगोंदा) वैद्यकीय क्षेत्रातील डॉ.सौ.संपदा रोहन खवटे (दौंड) डॉ. सौ सोनाली उल्हास बांदल (करडे) डॉ. सौ वैशाली लगड (बेलवंडी) डॉ निलेश पाटील (श्रीगोंदा) प्रशासकीय क्षेत्रातील सुनील मेरूकर (आरटीओ अहिल्यानगर) सौ .क्रांती चौधरी (कृषी अधिकारी श्रीगोंदा) सौ.पुष्पगंधा भगत (मुख्याधिकारी श्रीगोंदा) ज्ञानेश कोरे (पुरवठा अधिकारी श्रीगोंदा) अध्यात्म क्षेत्रातील रावसाहेब शिपलकर सर (कौठा)आबासाहेब नवले महाराज (तांदळी दुमाला). पर्यावरण क्षेत्रातील राजू परकाळे (कौठा ) ओंकार अस्वले (वीरगाव अकोले) वसुंधरा गृप (लोणी व्यंकनाथ) शिवदुर्ग ट्रेकर्स (श्रीगोंदा) उद्योग क्षेत्रातील किशोर बोगावत (एच. यु.गुगळे.काष्टी) बाळासाहेब नवाळे {अकोले,राजुर ),संदीप धुमाळ (बेलवंडी),महावीर पटवा (श्रीगोंदा), भाऊसाहेब दांडेकर (श्रीगोंदा) राजकीय क्षेत्रातील आमदार.अमित गोरखे (चिंचवड) आमदार.विक्रमसिंह पाचपुते (श्रीगोंदा) आमदार. हेमंत (तात्या) उगले (श्रीरामपूर) सौ.शुभांगी सप्रे (श्रीगोंदा) सौ.दीप्ती सुवेंद्र गांधी (अहिल्यानगर ) संदीप नागवडे सर (वांगदरी) कृष्णा दिपकशेठ नागवडे (वांगदरी). तसेच वृत्तपत्र विक्रेते (विशेष पुरस्कार) माधव बनसुडे (श्रीगोंदा) व रमाकांत क्षीरसागर (काष्टी) याप्रमाणे विविध क्षेत्रातील उपरोक्त व्यक्ती व संस्था यांना रविवार दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी श्रीगोंदा येथील नगरपरिषद सभागृहात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. अशी माहीती वादळी स्वातंत्र्य चे संपादक जितेंद्र पितळे यांनी दिली आहे.
वादळी स्वातंत्र्यच्या “वादळी सन्मान पुरस्कार २०२५ चे ५ ऑक्टोबर ला वितरण.



