Headlines

जातेगावसह तालुक्याच्या वैभवात भर पडेल : आमदार काशिनाथ दाते सर

श्री भैरवनाथ देवस्थानच्या विकासकामांना ₹१ कोटी ५४ लाख

पारनेर / भगवान गायकवाड,

पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार  काशिनाथ दाते सर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले असून, श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, जातेगाव ता. पारनेर येथे होणाऱ्या विविध विकासकामांना शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना “ब वर्ग” अंतर्गत या कामांना एकूण ₹१ कोटी ५४ लाख ७८ हजार ६२० रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून आमदार दाते सर हे श्री भैरवनाथ देवस्थान येथे आवश्यक मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी मिळावा याकरिता सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे या यात्रास्थळाच्या विकासाला चालना मिळणार असून, भाविक व यात्रेकरूंसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या कामांना मिळालेल्या मंजुरीबद्दल आमदार काशिनाथ दाते सरांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील आणि ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व सर्व अधिकारी वर्गाचे यांचे मनःपूर्वक आभार.

या मंजुरीमुळे श्री भैरवनाथ देवस्थान, जातेगाव हे यात्रास्थळ नव्या उर्जेने सजणार असून, जातेगावच्या वैभवात अधिकची भर पडणार असल्याने स्थानिक ग्रामस्थांसह भाविक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये कीर्तन हॉल बांधकाम करणे – ₹६४,२६,४५१, भक्तनिवास बांधकाम करणे  – ₹५७,७२,९९७, सभामंडप बांधकाम करणे – ₹११,३४,२०७ आणि किचनचे बांधकाम करणे  – ₹२१,४४,९६५ या चार महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. या सर्व कामांमुळे यात्रास्थळाचे स्वरूप अधिक आकर्षक व सुसज्ज होईल.
– आ. काशिनाथ दाते सर
(विधानसभा सदस्य)

श्री भैरवनाथ देवस्थान मंदिर परिसरात विकासकामे करण्यासाठी आ. काशिनाथ दाते सरांनी निधी मिळवुन दिला, या निधीमुळे देवस्थानच्या वैभवात  पडणार आहे, आम्ही सर्व विश्वस्त पालकमंत्री विखे साहेब तसेच महाराष्ट्र शासनाचे खुप खुप आभारी आहोत.
– श्री. सुरेश बोरुडे सर
(विश्वस्त, श्री. भैरवनाथ मंदिर ट्रस्ट जातेगाव)

Advertisement
Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *