पारनेर / भगवान गायकवाड,
खडकवाडी येथील भूमिपुत्र, शेतकरी संघटनेचे तालुका प्रवक्ता आणि लोकनेते निलेश लंके प्रतिष्ठानचे सदस्य राजेंद्र मधुकर रोकडे यांच्या मातोश्री गं. भा. केसरबाई मधुकर रोकडे यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६७ वर्षे होते.
स्वर्गीय केसरबाई रोकडे या अत्यंत कष्टाळू आणि मायाळू स्वभावाच्या होत्या. गावातील सर्व सण, समारंभ आणि धार्मिक उत्सवांमध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग असे. अतिशय सामान्य परिस्थितीतून त्यांनी आपल्या कठोर परिश्रमातून कुटुंबाला समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांच्या अकाली जाण्यामुळे खडकवाडी आणि पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात ३ मुले, सुना, मुलगी, दीर आणि पुतणे असा मोठा परिवार आहे. या परिवाराने आजारपणात त्यांची उत्तम सेवा केली. सोमवारी सकाळी ११ वाजता हजारोंच्या समुदायाच्या उपस्थितीत स्व. केसरबाई रोकडे यांना अखेरचा भावपूर्ण निरोप देण्यात आला.
अहिल्यानगर दक्षिण लोकसभा सदस्य खासदार लोकनेते निलेश लंके यांनी रोकडे परिवाराचे सांत्वन केले आहे. तसेच, राजेंद्र रोकडे यांना सामाजिक कार्यात प्रेरणा व प्रोत्साहन देणाऱ्या या मातेचा सार्थ अभिमान वाटतो, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.



