पारनेर / भगवान गायकवाड,
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवण्यासाठी आझाद मैदान येथे आंदोलनाला पाठिबा देण्यासाठी गेलेल्या आंदोलन कर्त्याची जाणीव पूर्वक अन्न व पाण्याची टंचाई सरकार कडून केली जात आहे. पण परिस्थिती जितकी बिकट तितकाच मराठा तिखट या म्हणी प्रमाणे महाराष्ट्राच्या गाव गाड्यातून आंदोलनासाठी गेलेले आपले समाज बांधव उपाशी राहू नये. म्हणून गाव गाड्यातील पारनेर शहरातील तरुण समाज बांधवानी शहरातील नागरिकांना आंदोलक मावळ्याना खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन केले होते.त्या आवाहनाला शहरातील छोटे मोठे व्यावसायिक, ग्रामस्थ, राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील समाज बांधवानी मोठ्या प्रमाणात आवाहनाला प्रतिसाद देत निस्वार्थी पने समाज बांधवांकडे खाण्यापिण्याची रसद पुरविण्यास प्रारंभ केला.


दिवसभरात बहुतांश बांधवानी मोठ्या प्रमाणात मुंबई येथील आंदोलन करणाऱ्या मावळ्याना चिवडा, पाणी बॉटल, बिस्कीट बॉक्स, फळे, इत्यादी खाण्यापिण्याची रसद पारनेर शहरातील छोटे मोठे व्यापारी, सामान्य नागरिक, राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील समाज बांधवाचे वतीने पाठवण्यात येणार आहे. त्या करिता सकल मराठा बांधव ,बाळासाहेब मते, चंद्रकात कावरे, दत्तात्रय अंबुले, नगरसेवक अशोक चेडे, सतीश म्हस्के, संभाजी मगर,संभाजी औटी ( सर), निलेश खोडदे, पत्रकार विनोद गोळे, मच्छिंद्र मते, ॲड. गणेश कावरे, धीरज महांडुळे, संदीप मोढवे, आदी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

पारनेर येथील आठवडे बाजारचा दिवस असल्याने फळे व्यवसायासाठी बाहेरगावरून आलेल्या मुस्लिम बांधवांनि स्वच्छेने मुंबई येथील मावळ्याना सफरचंद, पेरू, केळी या प्रकारची फळे मराठा समाज बांधवांकडे सुपूर्द केली. तर पारनेर वेशीच्या प्रवेशद्वारावर फुलांचा व्यवसाय करणाऱ्या व हातावर पोट असणाऱ्या सौ. ढगे या दिव्यांग महिलेने पाण्याचे बॉक्स आंदोलन कर्त्यासाठी दिले.