पारनेर, हंगा, सुपा रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य

पारनेर / भगवान गायकवाड,
   पारनेर हंगा सुपा या राज्यमार्गावर मागील काही दिवसा पूर्वी सतत पडणाऱ्या पावसाने जागोजागी मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्याने या रस्त्यावरून बहुतेक चाकरमाने दैनंदिन प्रवास करत असल्याने त्यांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहे. पारनेर शहरातील एडिसीसी बँक, आनंद हॉस्पिटल, महानगर बँक, हॉटेल यशवंत, ग्रामीण रुग्णालय, कण्हेर ओहळ, हंगा हडकी, जाधव मुळे सोसायटी प्रवेशद्वार, एम आय डी सी चौक या रस्त्यावर कमालीचे खड्डे पडल्याने नागरिकांना हाल सहन करावे लागत आहे.


या राज्य मार्गावरील रस्त्यांची दयनीय अवस्था बनली असून रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबर पूर्णपणे उखडून खडी उघडी पडून रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडून या खड्ड्यात पाऊसाचे पाणी साचत असल्याने या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहन धारकांना प्रचंड हाल सहन करत प्रवास करावा लागत आहे. पाऊसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने त्या खड्ड्यांचा वाहन धारकांना अंदाज येत नाही. व पाणी साचल्याने खड्डे दिसत नाही. त्यामुळे खड्ड्यात वाहने आदळून अपघात होण्याच्या घटना घडत आहे. व वाहने घसरून वाहन धारक जखमी होत आहे.


    या मार्गावरून सतत रात्रदिवस सर्व प्रकारच्या वाहनांची वर्दळ पहावयास मिळत आहे. सतत वाहनांची वर्दळ असल्याने मागील काही दिवसापासून होत असलेल्या पावसाने या प्रमुख  रस्त्यावर मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित अभियंत्यांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या मार्गावरील खड्डे डांबर किंवा सिमेंट काँक्रीटने भरून रस्ता वाहन धारकां साठी व प्रवाश्यांना प्रवास आरामदायी व्हावा असा बनवावा अशी मागणी प्रवासी वाहन धारकां कडून होत आहे. तसेच या मार्गावरील गावे, शहरांची अंतरे स्टोन किमी दर्शक फलक बसवावेत. लवकरात लवकर खड्डेची डागडुजी करून प्रवाशांसाठी रस्ता सुखकर करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.

Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *