पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील डॉ. विजयकुमार दिवटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तालुका उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. पारनेर येथील अहमदनगर जिल्हा बॅंक सभागृहात पार पडलेल्या पदाधिकारी निवडी दरम्यान डॉ. दिवटे यांना जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, पारनेर- नगर विधानसभा मतदारसंघ संघाचे आमदार काशिनाथ दाते सर, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, मा. जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी बाबुर्डी गावचे माजी सरपंच सुभाष दिवटे, सामाजिक कार्यकर्ते विकास गाडगे मेजर, सोपान तात्या गारकर यांच्या हस्ते डॉ. दिवटे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. दिवटे म्हणाले की, वरिष्ठांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता तालुक्यात पक्ष संघटना मजबूत करणार असून सत्तेच्या माध्यमातून विविध विकास योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
बाबुर्डी गावच्या कार्यकर्त्याची थेट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उपाध्यक्ष पदी डॉ. दिवटे यांची वर्णी लागल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य प्रमोद दिवटे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पिसे, माजी सरपंच रमेश गवळी, मा. सरपंच शोभाताई जगताप, मनिषा जगताप, माजी उपसरपंच रविंद्र गवळी, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण दिवटे, चेअरमन सुभाष सीताराम ठुबे, बाळासाहेब काकडे सर, संतोष थिटे सर, मारूती गवळी, रामदास गाडगे, छबन गाडगे, मच्छिंद्र काकडे, पी. आय. चेतन काकडे, रमेश दिवटे, गोरक्ष जगताप, संतोष जगताप, तात्याभाऊ आरखडे, संतोष दिवटे मेजर, सुरेश सोनबा दिवटे, शिवाजी दिवटे, अरुण ठुबे, माजी चेअरमन बाळासाहेब दिवटे, भाऊसाहेब दिवटे, अरविंद दिवटे, युवा उद्योजक ज्ञानदेव जगताप, प्रभात डेअरी चेअरमन विठ्ठल दिवटे, पोपट रंगनाथ दिवटे, अशोक आप्पाजी दिवटे, दादा गोरक्ष गारकर, मच्छिंद्र गवळी, ज्ञानदेव दिवटे, दत्तात्रय गवळी, अविनाश दिवटे, भास्कर गाडगे, सोमनाथ दिवटे, राजू गवळी, दादा महाराज गवळी, राहुल गवळी, तेजस दिवटे पाटील आदींनी डॉ. दिवटे यांचे अभिनंदन केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तालुका उपाध्यक्षपदी डॉ.विजयकुमार दिवटे यांची निवड
