विनायक विद्या मंदिर शाळेत मूल्य शिक्षण आणि व्यसनमुक्ती अभियान
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मिडिया यांचा सामाजिक उपक्रम
पारनेर / भगवान गायकवाड,
पारनेर शहरातील समाजसेवा विकास मंडळाचे विद्या विनायक मंदिर शाळेत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मिडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रह्माकुमारी साधना दिदी यांच्या संकल्पनेतून शाळेत मूल्य शिक्षण आणि व्यसनमुक्ती अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी विद्या विनायक मंदिर संस्थेचे अध्यक्ष शाहूराव औटी (सर) होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा बांदल,शिक्षिका जयश्री कोरडे, ईश्वरीय विश्व विद्यालयाचे साधक राम भाई, सविता औटी, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभा बांदल यांनी केले.
यावेळी ब्रह्माकुमारी साधना दिदी यांनी विद्यार्थ्यांना मेडिटेशन आणि मूल्य शिक्षणाचे महत्त्व गोष्टीरूपाने समजून सांगितले.


विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ब्रह्माकुमारी साधना दिदी म्हणाल्या की, आपला भारत देश हा आध्यात्मिकता आणि विविध संस्कृती यांचा आगळा वेगळा संगम आहे. याचा आपल्याला नेहमीच अभिमान वाटावा असाच आपला देश आहे. देवाला आवडणारी ज्या प्रमाणे फुले असतात त्याच प्रमाणे लहान मुलेही देवाघरची फुले असतात असे म्हटले जाते. जस की फुलांमध्ये वेगळे रंग असतात तसेच ईश्वराने आपण सर्वांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुण भरलेले आहेत.

मानवा मधील प्रेम,दया, शांती, मानवता, दिव्यता, मधुरता, महानता, अशा दिव्य गुणांनी आपण परिपूर्ण बनून ईश्वराने आपल्याला मनुष्य जीवन दिले आहे. मग का नाही आपण चांगले वर्तन करून, चांगले ऐकून, चांगले बोलून, चांगले कर्म करून आपण आपल्या आई वडिलांचे आपल्या शाळेचे नाव मोठे करू शकतो. विनायक विद्या मंदिर म्हणजे जो ईश्वर सगळ्या विश्वावाचाही नाथ आहे. अशा सुंदर शाळेत आपण पुस्तकी ज्ञाना बरोबरच मानवी मूल्यांनी जीवन अधिकच सुंदर व स्वच्छ बनवू शकतो.
सूत्रसंचालक शोभा बांदल यांनी केले तर आभार सविता औटी व ईश्वरीय परिवाराने मानले.