सुभाष सासवडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षपदी
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताकदीत वाढ झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत पारनेर तालुका शिवसेना युवासेनेमधील (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी आमदार काशिनाथ दाते यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यानंतर पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत सुभाष सासवडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी निवडीचे पत्र आमदार काशिनाथ दाते, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर आणि युवक तालुका अध्यक्ष भास्कर उचाळे यांनी सासवडे यांना प्रदान केले.

निवडीनंतर सुभाष सासवडे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. या प्रसंगी पारनेर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष विजय औटी, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सुषमा रावडे, युवती तालुकाध्यक्ष अपर्णा खामकर, सुदामती कवाद, सोनाबाई चौधरी, संदीप कपाळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सासवडे यांनी शिवसेना युवासेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पक्षाची पारनेर तालुक्यातील ताकद वाढली आहे. यामुळे स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्याला नवीन गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सासवडे यांच्या नेतृत्वाखाली युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याला बळकटी येण्याची अपेक्षा आहे.
