पतसंस्था पिडीत कर्जदार, जामीनदारांचा पारनेरला  मेळावा….!

पारनेर / भगवान गायकवाड,

पारनेर तालुक्यातील पतसंस्थांच्या  कर्जामुळे पिडीत असलेल्या कर्जदार व जामीनदारांचा मेळावा पारनेर येथे संपन्न झाला. या मेळाव्याचे आयोजन लोकजागृती सामाजिक संस्थेने केले होते.
पारनेर तालुक्यात पतसंस्थांच्या  मनमानी व बेकायदा कर्ज वसुली प्रकरणी अनेक कर्जदार,जामीनदारांनी लोक जागृती सामाजिक संस्थेकडे तक्रारी केल्या होत्या, पतसंस्था, फेडरेशन, वसुली अधिकारी, महसुल अधिकारी आणि  सहकार खात्याचे अधिकारी
यांनी संगनमताने अनेक कर्जदार व  जामीनदारांच्या जमीनी जप्त केल्या आहेत.  त्यांची  पगार व बॅक खाती गोठावली आहेत.  हा प्रकार पारनेर सह इतरत्र  सर्रास चालु आहे. सहकार विभागाचे अधिकारी बेकायदा वसुली दाखले पतसंस्थांना देत आहेत असे दिसुन आले आहे.
सहकारी पतसंस्थांचे संचालक मंडळ यांच्या कडुन  सहकार विभागाचे अधिकारी यांना हाताशी  धरून 
शेतकऱ्यांच्या जमीनी / मालमत्ता हडपण्याचे मोठे शडयंत्र चालु आहे. असा आरोप अँड. रामदास घावटे यांनी मेळाव्याला मार्गदर्शन करताना केला आहे.


    पारनेर तालुक्यात बंद पडलेल्या पतसंस्था  स्वतःचे संस्थांमध्ये विलीन  करून  त्या संस्थांच्या  कर्जदार,  जामीनदारांवर  अनेक बेकायदा कारवाया चालु आहेत.
       पतसंस्थांकडून  चार ते पाच वर्षांत दिलेल्या कर्जाच्या तीन ते चार पट रकमा केलेल्या आहेत. वसुली दाखले मिळवण्याकरीता सहकार विभागाचे अधिकारी कोणतीहि पडताळणी करत नाहीत, असे अनेक प्रकरणांतुन समोर आले आहे.
थकीत  कर्जदार / जामीनदार सामोपचार योजनेतुन कर्ज भरायला तयार असताना पतसंस्था नकार देतात. यातुन पतसंस्थांचा कर्जदार / जामीनदारांच्या शोषणाचा उद्देश
स्पष्टपणे दिसुन आलेला आहे.


       संस्थाचालक व वसुली अधिकारी कर्जदार व जामीनदारांवर दादागीरी करत असल्याच्या काही घटना मेळाव्याचे वेळी पिडितांनी पुराव्यासह पुढे आणल्या.
          पतसंस्था, फेडरेशन व  वसुली अधिकारी यांनी सहकार कायद्याचे पुर्णपणे उल्लंघन करून शोषण चालवले असल्याचा निष्कर्ष यावेळी
मेळाव्यात निघाला.  यावेळी पतसंस्था चालक, फेडरेशन व सहकार विभागाचे अधिकारी यांचा जाहीर निषेध करण्यात आला. व त्यांचेवर खातेनिहाय चौकशीची कारवाई करण्यासाठी 
शासणाला मागण्यांचे निवेदन
देण्यात आले. पतसंस्थांच्या कर्जामुळे पिडीत झालेल्या कर्जदार, जामीनदारांना सर्वोतोपरी  कायदेशीर मदत करण्याचे  आश्वासन अँड. घावटे यांनी यावेळी उपस्थितांना दिले.
पारनेर येथील राम मंदीरात हा मेळावा संपन्न झाला. अँड. रामदास घावटे, अँड. उन्मेश चौधरी, अँड. सोमनाथ गोपाळे यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले.

Advertisement
Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *