पारनेर / भगवान गायकवाड,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडोबा माळ, रुई छत्रपती येथे शनिवार दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वा. एक आनंददायी व उत्साहवर्धक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामध्ये बदली होऊन कार्यमुक्त होत असलेल्या व बदली झालेल्या शिक्षकांचा सत्कार, नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचे स्वागत तसेच शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यात आली.
प्रथम, बदली झालेल्या सौ. मनिषा तुळशीराम काळे यांना शाळेतून कार्यमुक्त करण्यात आले. त्यांच्या सेवेचा गौरव करताना उपस्थितांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. यावेळी मॅडम काळे यांनी शाळेतील आपले अनुभव कथन करताना पालक, विद्यार्थी व सहकाऱ्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
त्यानंतर शाळेत नव्याने रुजू झालेल्या सौ. बालिका मारुती श्रीमंदिलकर व श्री. बाळासाहेब विठ्ठल सोनवणे यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. त्यांनी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ घडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यात आली. नूतन समितीत श्री. सचिन गोपाळ वाबळे यांची अध्यक्ष, सौ. सोनाली राजेंद्र साबळे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सदस्य म्हणून सौ. शुभांगी राहुल ईरोळे, सौ. सारिका अभिलाष गोरे, सौ. सुरेखा गोरख दिवटे, श्री. जनार्दन दत्तात्रय गोरे, श्री. पोपट विठोबा कोळेकर यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत प्रतिनिधी म्हणून सौ. अर्चना साबळे तर शिक्षक प्रेमी म्हणून श्री. कुंडलिक भिकू साबळे यांची निवड झाली. शाळेतील शिक्षक सौ. बालिका श्रीमंदिलकर व श्री. बाळासाहेब सोनवणे यांची समितीचे सचिव म्हणून निवड करण्यात आली.
कार्यक्रमात श्री. राजू मेहेत्रे, श्री. बंडू साबळे, श्री. बाळासाहेब बारवकर, सौ. अर्चना साबळे आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण श्री. शेखर साबळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. मोहन साबळे, श्री. चंद्रकांत बारवकर यांनी नियोजन केले. कार्यक्रमासाठी बंडू साबळे, कालिदास बारवकर, संदिप बेल्हेकर, खंडू बारवकर, लता साबळे, राधा साबळे, वैशाली साबळे, सविता लोंढे, शिल्पा साबळे, मनिषा साबळे, शालन साबळे, विमल साबळे, कविता साबळे, ज्योती बेल्हेकर, शंकर अप्पा साबळे, गोरख दिवटे मेजर, संतोष साबळे, नवनाथ लोंढे, राजू साबळे, सखाराम मेहेत्रे, बन्सी साबळे, पांडुरंग साबळे, सीताराम भुजबळ, सौ. सीमा जगताप (अंगणवाडी शिक्षिका) व दिवटे मॅडम (अंगणवाडी सेविका) आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



