Headlines

हिंसक बनलेल्या बिबटयांना पकडण्यासाठी आठ दिवसांत उपाययोजना करा; पारनेर ग्रामस्थांचे वन विभागात आंदोलन


पारनेर / भगवान गायकवाड,
हिंसक बनलेल्या बिबट्या ने चार वर्षे च्या मुलाला घरासमोरून उचलून नेले ही दुर्दैवी घटना असून त्या बिबट्या ला पकडण्यासाठी आठ दिवसांत उपाययोजना करा अन्यथा वन विभागाच्या विरोधात जिल्हा वन विभागाच्या कार्यालयात आंदोलन करण्यात येईल असा इशारा पारनेर ग्रामस्थांनी दिला.

  पारनेर शहरा जवळील सिद्धेश्वर वाडी रस्ता वरील डोंगरे – औटी वस्ती जवळील एका चार वर्षे मुलाला बिबट्या ने आठ सप्टेंबर च्या रात्री उचलून नेले होते. यामुळे परीसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पारनेर ग्रामस्थांचे वतीने पारनेर वन विभागाच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरसेवक अशोक चेडे, संभाजी मगर,भाजपचे मंडल चिटणीस कल्याण थोरात, वकील गणेश कावरे, विनोद गोळे,तुषार औटी, सतिश म्हस्के, माजी नगरसेवक विशाल शिंदे, प्रमोद पवार , भाऊ घोडके, रमेश सिंग,संदीप कावरे,  आदीसह युवक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


  पारनेर शहरातील परीसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्या असलेल्या ठिकाणी तातडीने पिंजरे लावून बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी वन विभाग बरोबर पोलिस बंदोबस्त साठी मदत करतील असे आश्वासन दिले. वन अधिकारी धाडे यांनी बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले असून उपाययोजना सुरू आहेत असं सांगितलं. निघोज चे शेतकरी नेते महेंद्र पांढरकर यांनीही निघोज व परीसररातील गावांमध्ये बिबट्या चे संख्या वाढली असून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मोहीम राबवा अशी मागणी केली.

वन विभागाने बिबट्या पकडण्यासाठी निष्काळजीपणा केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल. वन विभागाने शोध मोहीम राबवावी.
– अशोक चेडे, नगरसेवक, पारनेर नगरपंचायत

पारनेर शहरात व परीसरात बिबट्या नरभक्षक होण्याची पहीलीच वेळ आहे. बिबट्या नरभक्षक होणे पारनेर शहराच्या दृष्टीने धोकादायक असून वन विभाग ने तातडीने बंदोबस्त करावा.
  – ॲड. गणेश कावरे, जनजागृती समीती पारनेर

बिबट्या रात्रीचा संचार करीत असून नगरपंचायत ने परीसरात पथदिवे तातडीने बसवावे.
   – तुषार औटी, जनजागृती समीती पारनेर

Advertisement
Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *