वासुंदे विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुहास वाबळे उपाध्यक्षपदी सचिन उगले
संस्थेचे अध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते सत्कार व सन्मान
पारनेर/प्रतिनिधी :
श्री भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित न्यू इंग्लिश स्कूल, वासुंदे येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुहास वाबळे यांची, तर उपाध्यक्षपदी सचिन उगले यांची निवड करण्यात आली. या निवडीचे स्वागत आणि सत्कार समारंभ संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला यावेळी संस्थेचे निरीक्षक शरदराव पाटील, माजी उपसरपंच शंकर बर्वे, सोसायटीचे चेअरमन सूर्यभान भालेकर , व्हा. चेअरमन लक्ष्मण झावरे माजी चेअरमन नारायण झावरे, पो. मा. झावरे, बापूसाहेब गायखे, विकास झावरे, बाळासाहेब वाबळे, रा. बा. झावरे, पोपट हिंगडे, बाळासाहेब झावरे, नाना वाबळे, दिलीप पाटोळे, पी. डी बर्वे, मारुती उगले, आदी उपस्थित होते.
या निवडीमुळे शाळेच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सुहास वाबळे आणि सचिन उगले यांनी निवडीनंतर शाळेच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प व्यक्त केला. संस्थेचे अध्यक्ष सुजितराव झावरे पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत शाळेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही शाळेच्या विकासासाठी सहकार्याचा निर्धार व्यक्त केला. हा समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



