Headlines

नांदूरपठार, पिंपळगांवरोठा बस सुरू करा; रवींद्र राजदेव यांची मागणी

नांदूरपठार, पिंपळगांवरोठा बस सुरू करा

निलेश लंके प्रतिष्ठानचे रवींद्र राजदेव यांचा आंदोलनाचा इशारा

पारनेर/प्रतिनिधी :
वर्षानुवर्षे सुरू असलेली पारनेर-नांदूरपठार व नांदूरपठार-नगर बस ही नियमितपणे येत नसून नगर ते पिंपळगांवरोठा ही बस अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या पारनेर आगाराने या बसेस नियमित सुरू कराव्यात या मागणीचे निवेदन नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने उपाध्यक्ष रविंद्र राजदेव यांनी आगारप्रमुखांना सादर केले असून बसेस सुरू न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बहुजन सुखाय, बहुजन हिताय तसेच गाव तिथे एसटी हे ब्रिद घेउन खेडयापाडयांमध्ये सेवा देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाची पारनेर-नांदूरपठार ही बस नियमित सुरू होती. पारनेर-नांदूरपठार-अहिल्यानगर असा या बसचा मार्ग आहे. या बसचा उपयोग विद्यार्थी, प्रवासी तसेच नगरला औषधोपचारासाठी जाणा-या रूग्णांना होतो. दुसरीकडे नगरहून दुपारी अडीच वाजता पिंपळगांव रोठा या बसने नागरिकांना पुन्हा नांदूरपठार, पिंपळगांवरोठा येथे येता येत असे. कान्हूरपठार येथील अनेक पासधारक विद्यार्थीही या बसचा वापर करत होते. जनतेच्या सेवेसाठी असलेल्या या बससेवा अचानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रवाशांची मोठी कुचंबना होत आहे.
पारनेर-नांदूरपठार ही बस सुरेगांव मुक्कामी बसशी लिंक आहे. आता प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे ही बस फक्त मंगळवार, बुधवार, गुरूवार व शुक्रवार या चारच दिवशी नांदूरपठारकडे येते. इतर दिवशी ही बस कुठे जाते ? तर नगर-पिंपळगांवरोठा ही बस बंद करून कुठे वळविली याचीही माहीती पारनेर आगार प्रशासनास असावी असा उपरोधीक टोला या निवेदनात लगावण्यात आला आहे.

या मार्गावरील दोन्ही बसेस दररोज सुरळीत सुरू न झाल्यास पारनेर आगारात प्रसार माध्यमांना सोबत घेऊन आमच्या स्टाईनले आंदोलन करून जाब विचारला जाईल. बसेस सुरू होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. पारनेर आगार प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी. असा इशारा निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रवींद्र राजदेव यांनी प्रशासनाला दिला आहे.

Advertisement
Share This News On

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *