पारनेर नगरपंचायतचे मध्यवर्ती ठिकाणचे स्वच्छतागृह बंद अवस्थेत, नागरिकांची गैरसोय
पारनेर / भगवान गायकवाड, पारनेर नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे शहरातील बसस्थानक चौकात असलेले सार्वजनिक स्वच्छतागृह गेली कित्येक दिवस बंद अवस्थेत असून, यामुळे पारनेर शहरासह तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या स्वच्छतागृहांकडे नगरपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.शहरात विविध कामानिमित्त येणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी ही सार्वजनिक स्वच्छतागृहे अत्यंत आवश्यक आहेत. मात्र,…


